त्या दोघांना “व्यवस्थे” ने चिरडले

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : धन दांडग्या बापाच्या मद्य धुंद दिवट्या(crushed) चिरंजीवाने आय. टी. इंजिनीयर असलेल्या अनिश अवलीय आणि अश्विनी कोष्टा या दोघांना आलिशान गाडीखाली चिरडले. कल्याणी नगर परिसरात मध्यरात्री या दोघा जणांनी रस्त्यावर तडफडत आपला जीव सोडला. तांत्रिक दृष्ट्या हा भीषण अपघात असला तरी त्या दोघांचा इथल्या भ्रष्ट व्यवस्थेने बळी घेतला आहे किंवा हत्या केली आहे असे म्हणता येईल.

बांधकाम व्यावसायिक विशाल(crushed) अग्रवाल, हॉटेल कोझी चा मालक नमन प्रसाद भुतडा, व्यवस्थापक सचिन अशोक काटकर, सहाय्यक व्यवस्थापक संदीप रमेश सांगळे या चौघांना पुणे पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी अटक केली. पोर्शे या आलिशान कार खाली दोघा जणांना चिरडणाऱ्या मद्य धुंद युवकाला तो अल्पवयीन असल्यामुळे जुवेनाईल कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला.

अल्पवयीन संशयित आरोपीच्या संदर्भात असलेल्या विद्यमान कायद्यानुसार जुवेनाईल कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला ही सनदशीर प्रक्रिया आहे. वाहतूक व्यवस्थेवर एक निबंध लिहायचा, वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांच्या बरोबर पंधरा दिवस वाहतूक नियंत्रणाचे काम करायचे अशा अटी त्याला जामीन मंजूर करताना घालण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या अटी आणि शर्थी लोकांच्या समोर प्रथमच आल्यामुळे, असं काही असतं का? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.

पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात गेल्या रविवारी मध्यरात्री घडलेल्या या अपघात प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जातो आहे. त्या धनदांडग्याच्या पोराला केवळ काही तासात जामीन कसा काय मंजूर होतो असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून विचारला गेला आहे. या अपघाताची एकूण गंभीरता आणि लोकभावना लक्षात घेऊन संबंधित अल्पवयीन संशयित आरोपीचा जामीन रद्द करण्याच्या संदर्भात विचार व्हावा अशी एक याचीका आता पुणे पोलिसांकडून जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केली जाणार आहे.

सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होत असलेल्या संतापावर उतारा म्हणून, किंवा लोकांचा राग शांत व्हावा म्हणून पुणे पोलिसांनी अशा प्रकारची याचिका दाखल केलेली दिसते. विशाल अग्रवाल यांची पोर्शै ही आलिशान कार तीन महिन्यापूर्वी एकाच वाहन विक्री व्यवस्थापनाने विकलेली होती. तब्बल तीन महिने या कारचे रजिस्ट्रेशन झालेले नव्हते. वाहन नोंदणी क्रमांक शिवाय ही कार पुणे शहरात फिरत होती, मात्र ती पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाऱ्यांना दिसली नाही. किंवा दिसली असली तरी कायदेशीर कारवाई केलेली नाही.

आरटीओ कडून या कारचे रजिस्ट्रेशन का झाले नाही? कारची विक्री होऊनही आपल्या कार्यालयाकडून तिचे रजिस्ट्रेशन अध्यापक का झाले नाही याची चौकशी आरटीओ कार्यालयाकडून केली गेलेली नाही. कोणताही बार किंवा परमिट रूम रात्री अकरा वाजल्यानंतर बंद केला पाहिजे हा नियम आहे. परमिट रूम मध्ये किंवा बार मध्ये अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश निषिद्ध आहे. पण तरीही त्या अल्पवयीन मुलाला तिथे प्रवेश देण्यात आला. त्याला मद्य देण्यात आले. मालक किंवा व्यवस्थापक यांनी त्याला त्याचे वय विचारले नाही. बार मध्यरात्रीपर्यंत सुरू असतो हे माहीत असूनही उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलीस प्रशासनाकडून बार विरुद्ध कारवाई करण्यात आलेली नव्हती. रात्री अकरा वाजल्यानंतर साधी पान टपरी उघडी दिसली तर पान टपरी चालकाला पोलिसांच्या कडून दमात घेतले जाते.

दुचाकी किंवा चार चाकी वाहनावर नंबर प्लेट दिसली नाही किंवा ती फुटलेली असेल तर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस त्या वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करतात. पण इथे तर अग्रवाल यांची आलिशान कार नंबर प्लेट शिवाय तीन महिने पुणे शहरात फिरत होती आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांना ती तीन महिन्यात एकदाही दिसली नाही.
कोणत्याही बारमध्ये, परमिट रूम मध्ये येणाऱ्या ग्राहकाकडे मद्य सेवन करण्याचा शासकीय परवाना आहे किंवा नाही हे केव्हाही विचारले जात नाही. वास्तविक असा परवाना असणाऱ्या व्यक्तीलाच परमिट रूम मध्ये प्रवेश द्यावा असा नियम आहे. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी कुठेही होत नाही हे वास्तव आहे.

पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा, उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहन विक्री करणारी व्यावसायिक संस्था, अशा काही व्यवस्था प्रस्थापित आहेत. या व्यवस्थेतील प्रत्येक घटकाने आप आपली जबाबदारी नीटपणे पार पाडली असती तर कदाचित पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात” हिट अँड रन” चार
भीषण प्रकार घडलाच नसता. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवलीय यांच्या मनाला चटका लावून जाणाऱ्या मृत्यूला इथली ही व्यवस्था जबाबदार आहे असे म्हणावे लागेल.

हेही वाचा :

सांगलीत काँग्रेसप्रेमी कार्यकर्ता मेळाव्याला विशाल पाटलांची उपस्थिती, चर्चांना उधाण

आज तुमच्या यादीत ठेवा ‘हे’ 10 शेअर्स; देतील जबरदस्त परतावा

मोदी सरकारपुन्हा हात पसरलेरिझर्व्हबँकेकडून 2.11लाख कोटीसरकारच्तिजोरीत