बॉक्स ऑफिसवर दणका उडवला, आता ‘धर्मवीर 2’ घरबसल्या पाहता येणार

बॉक्स ऑफिसवर(ott platform) धुमाकुळ घालणारा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा धर्मवीर २ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेता प्रसाद ओकची प्रमुख भुमिका असणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी आतुरता होती.

२७ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला धर्मवीर २- साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा आता घरबसल्या पाहता येणार आहे. धर्मवीर-2 हा यंदाच्या वर्षातला सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे. त्यातच आता OTT वर आल्यानं घरोघरी हा चित्रपट पाहिला जाईल यात शंका नाही.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या राजकीय प्रवासासह त्यांच्या जीवनाचे अनेक पैलू या चित्रपटातून उलगडले आहेत. या चित्रपटाला बॉक्सऑफिसवर(ott platform) तुफान यश आलं असून आता घरी बसून हा चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांना संधी मिळणार आहे. धर्मवीर २ ची गोष्ट २५ ऑक्टोबरपासून zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

धर्मवीर २ चित्रपटात प्रसाद ओक या अभिनेत्याने आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत क्षितिज दाते, तसेच स्नेहर तरडे, आनंद इंगळे, सुनिल तावडे यासारखी तगडी मराठमोळी स्टारकास्ट या सिनेमात दिसत आहे.

सॅनसिल्कच्या अहवालानुसार, धर्मवीर 2 या सिनेमाने पहिल्याच दिवशी 1.74 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षातली सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला. त्यानंतरच्या शनिवार आणि रविवारही या सिनेमा प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिल्याचं चित्र पाहायला मिळालं. कारण दुसऱ्याच दिवशी या सिनेमाने 2.35 कोटी रुपयांची कमाई केली.

तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 2.75 कोटी रुपयांचा गल्ला जमावला. त्यामुळे तीनच दिवसांत या सिनेमाची 6.84 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. मिडिया अहवालांनुसार, अखेरीस भारतीय बॉक्स ऑफिसवर 15.47 कोटींची कमाई केली. धर्मवीर-2 हा सिनेमा मराठीसह हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हा सिनेमा संपूर्ण देशात प्रदर्शित करण्यात आला आहे.

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यावर धर्मवीर हा सिनेमा आधारित आहे. धर्मवीर या सिनेमातही आनंद दिघे यांच्या आयुष्याचा परिचय करुन देण्यात आला होता. त्यानंतर धर्मवीर -2 मध्येही त्यांच्याच आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला असल्याचं निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांनी सांगितलं. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या बंडाची देखील गोष्ट या सिनेमात असल्याचं सांगितलं जात आहे.

हेही वाचा :

शरद पवार गटाची अंतिम यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरुद्ध ‘हा’ नेता लढणार

‘मुलगी दिसायला सुंदर असेल तर…’; ‘या’ विधानामुळे अजित पवारांनी कापलं विद्यमान आमदाराचं तिकीट? पाहा Video

टेस्टमध्ये पराभवानंतर टीम इंडियापासून वेगळे झाले रोहित आणि विराट, मॅच संपल्यावर घेतला निर्णय