कोणतेही नाते आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे असते. मग तो भाऊ असो वा बहीण किंवा नवरा-बायकोच असेल किंवा मित्र-मैत्रिणीचं. तुम्ही रिलेशनशिपमध्ये(breakup) असाल तर तुमच्या जोडीदाराला काय आवडेल आणि काय नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. मुलांना मुलींच्या काही सवयी मुळीच आवडत नाहीत. परंतु मुलींना त्याची थोडीही कल्पना नसते.
त्यामुळे तुमच्या प्रेमाचं नातं (breakup)टिकवायचं असेल तर तुमच्या मुलींनो तुमच्या कोणत्या सवयी आहेत, ज्या तुमच्या मित्राला किंवा प्रियकराला आवडत नाहीत ते जाणून घ्या.मुलींना वाटतं की, मुलं त्यांच्या व्यक्तीमत्त्वाकडे लक्ष देत नाहीत. त्याचा त्यांच्या नात्यावर परिणाम होत नाही, असं वाटत असतं. परंतु तसं नसतं मुलं मुलींची प्रत्येक गोष्टींवर गंभीरपणे लक्ष देतात, त्यावर विचार करत असतात. मुलं मुलींची बोलण्याची, चालण्याची पद्धत, तसेच इतर कोणत्या गोष्टींवर कशी प्रतिक्रिया देतात.
मुली कशा प्रकारे हावभाव करतात, या गोष्टींवर मुले लक्ष ठेवत असतात. मुलांना मुलींच्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
मूड स्विंग
वारंवार मुलींच मूड स्विंग होणं हे मुलांना कधीच आवडत नाही. जर काही कारणास्तव मुली चिंतेत असतील किंवा तणावाखाली असल्याने मुलींचा मूड बदलत असतो, पण ही गोष्ट वेगळी आहे. परंतु वारंवार चिंतेच वातावरण तयार करणं, मुलांना राग आणणं, या गोष्टींमुळे मुलं चिडत असतात. त्यांना मुलींच्या या गोष्टी आवडत नाहीत.
मित्रांबद्दल वाईट बोलणं
मुलांना त्यांच्या मित्रांबद्दल वाईट गोष्टी ऐकायला कधीच आवडत नाहीत. जर एखादी मुलगी मुलासमोर त्याच्या मित्रांबाबत वाईट बोलत असेल तर मुलं नाराज होतात. त्यांना ती सवय आवडत नाही. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.
शंका
मुलींनो! तुम्ही जर तुमच्या मित्राल जाणून बुजून जाळण्याचा प्रयत्न करत असाल तर ते सोडून द्या. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होण्याची शकता आहे. मुलींची ही सवय मुलांना अजिबात आवडत नाही. त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी मुली हे करत असतात, पण मुलीने दुसऱ्यासोबत राहणं हे मुलांना अजिबात आवडत नाही. ही सवय तुमचे नाते बिघडू शकते.
स्पेस देने
प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात पर्सनल स्पेसची गरज असते, पण जर तुम्ही तुमच्या पार्टनरला स्पेस दिली नाही तर त्याचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुम्ही वाईट आहात असं मुलांना वाटू शकतं. त्यामुळे तुमच्या पार्टनरला वेळोवेळी स्पेस देत राहा जेणेकरून तुमचे नाते सुदृढ राहील.
पाठिंबा न देणं
जर तुम्ही तुमच्या जोडीदारावर प्रेम करत असाल तर त्याला तुमच्याकडून नेहमीच अपेक्षा असतात. म्हणून तुम्ही तुमच्या जोडीदाराला पाठिंबा दिला पाहिजे. जर तुम्ही हे केले नाही तर मुलांना ही गोष्ट आवडत नाही. यामुळे तुमच्या नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते.
हेही वाचा :
देवभाऊच्या मंत्रिमंडळात लाडक्या बहिणींना स्थान, तीन-तीन महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी
ग्राहकांना सुखद धक्का! सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी उतरले भाव
लाडक्या बहिणींनी यंदा वाचवलं, मेहुण्यांनी दुसरी बटणं दाबली पण… :अजित पवार