अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, आता मलायका पुन्हा प्रेमात? ‘या’ कुल बॉयसोबतचा फोटो समोर

मुंबई : बॉलिवूडमधील काही कपल्स कायम चर्चेत असतात. काही जोड्या नव्याने जुळतात. त्यांचीही तेवढीच चर्चा होते. प्रेमात पडणाऱ्या स्टार्सोबतच ब्रेकअप(Break up) झालेल्यांचीही चर्चा रंगताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा अशाच काही गोष्टींमुळे लाईमलाईटमध्ये आली होती. तिचे अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाले आहे. असे असताना आता मलायका एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. तिचे काही फोटो व्हायरल झाले असून हा तरुण नेमका कोण? असं विचारलं जातंय.

प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोन याचा मुंबईत 8 डिसेंबर रोजी मोठा लाईव्ह कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला स्लीमगर्ल म्हणून ओळख असलेली मलायका अरोराही हजर होती. काळ्या शॉर्ट ड्रेसमध्य मोकळे केस सोडून आलेल्या मलायकने या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विशेष म्हणजे खुद्द एपी ठिल्लोन यानेही तिला थेट स्टेजवर बोलवून तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक केले. तू माझी लहानपणीची क्रश आहेत, असंही त्याने मलायकाला आवर्जून सांगितले.

स्टेजवर बोलावल्यानंतर एपी ढिल्लोनच्या गाण्यावर मलायका अरोरा चांगलीच थिरकताना दिसली. दरम्यान यास लाईव्ह कॉन्सर्टमधील तिचे अन्य फोटोही व्हायरल होत आहेत. ती स्टेजखाली सामान्य प्रेक्षकांमध्ये असतानाचे हे फोटो आहेत. याच व्हायरल झालेल्या फोटोत ती एका तरुणासोबत दिसत आहे. हा फोटो पाहून मलायकासोबत आलेला हा तरूण नेमका कोण आहे, असं विचारलं जातंय. अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर(Break up) मलायका नेमकं कोणाला तरी डेट करत आहे का? असा प्रश्ना प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत.

एपी ढिल्लोनच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये मलायका अरोरासोबत एका मिस्ट्रीमॅन दिसला. या मिस्ट्रीमॅनचे नाव राहुल विजय असे आहे. खुद्द मलायकानेही राहुल विजयसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला तिने ‘With You’ हे गाणे जोडले होते. मलायकासोबतचे फोटो स्टायलिस्ट राहुलनेही आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत. स्नॅपचॅटवरही राहुलने मलायकाचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत का? असा प्रश्न मलायकाच्या चाहत्यांना पडला आहे.

दरम्यान, याआधीही गेल्या आठवड्यात मलयका अरोरा आमि राहुल विजय एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसले होते. मलायका अरोराने अभिनेता अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 2018 साली अभिनेता अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर आता ब्रेकअप झाल्यानंतर मलायकाला पुन्हा प्रेमात पडली आहे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचं निधन

2024 वर्ष सरता-सरता ‘या’ 4 राशींवर शनी होणार प्रसन्न

व्हॉट्सॲपचे आश्चर्यकारक फिचर! आता कोणीही ऐकू नाही शकणार तुमचा Voice Message