ब्रेकिंग! ‘शिवसेना शिंदे गट, अजित पवार गटातील ४० आमदारांची घरवापसी होणार’

लोकसभा निवडणुकानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या(politics) बाजूने वारे फिरले असून शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटातील ४० आमदार परत येणार असल्याचा सर्वात मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

भारतीय जनता पक्ष(politics) बेईमानांचा पक्ष आहे. उपयुक्त आहे तो पर्यंत उपयोग घ्यायचा नंतर सोडून द्यायचा. गेलेल्यांचे परतीचे दोर कापलेत. परत येऊ शकत नाहीत. पण मी विश्वासाने सांगतो अजित पवार गटातील आणि शिंदे गटातील ४० आमदारांची महिनाभरात घरवापसी होईल, अशी परिस्थिती आहे. वस्तुस्थिती माहीत नाही पण चर्चा जोरात आहे,” असे विजय वडेट्वीवार म्हणाले.

“कुणालाही संख्या बळावर मान सन्मान मिळतो. आजच्या स्थितीत अजित पवारांकडे सन्मान करण्यासारखे राहिले काय? त्यामुळे जो मिला ओ खाओ.. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण बार्गेनिंग पावर संपली आहे. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले तरी भरपूर आहे, अशी अवस्था अजित पवार गटाची आहे,” असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

तसेच “केंद्रात महायुतीचे सरकार आले नसते तर ते बाहेर पडले असते. त्यांची प्रकरणे क्लोज झाली असतील, जसा पटेलांचा ईडीचा मॅटर क्लोज झाला. सत्तेत जाऊन आपली प्रकरणे क्लोज करवून परत येत असतील तर ही चांगली आयडिया आहे. भारतातील लोकांना पटणारी आहे, असं समजायला हरकत नाही,” अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा :

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीत बस दरीत कोसळली 10 जणांचा मृत्यू

NDA च्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांची यादी पाहा..

अब्दुल सत्तार यांची काँग्रेसशी जवळीक; आघाडीच्या उमेदवाराणा घरी जाऊन भेट