ब्रेकिंग! प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना अटक

देशातील प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक प्रशांत किशोर यांना आज सोमवारी, पहाटे अटक(arrested) करण्यात आली आहे. आज (6 जानेवारी) पहाटेच्या सुमारास पटना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहिती नुसार, बीपीएससी परीक्षा पेपर लीक प्रकरणात ते आमरण उपोषणाला बसले होते. गांधी मुर्ती येथे त्यांनी उपोषण सुरू केलं होतं. मात्र, आज पहाटे चारच्या सुमारास बिहार पोलिसांनी त्यांनी ताब्यात घेतलंय.

अटक झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना AIIMS रुग्णालयात नेलं. मात्र, प्रशांत किशोर यांनी कुठलेही उपचार घेण्यास नकार दिलाय. त्यांनी रुग्णालयातही आमरण उपोषण कायम ठेवलं आहे. यावेळी जनसुराज पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झडप देखील झाली. प्रशांत किशोर यांना जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवण्यात आले.

प्रशांत किशोर हे बिहारच्या जनतेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी लढत होते. सरकार या एकतेला घाबरली. त्यांच्याविरोधात शारीरिक हिंसा निंदनीय आहे, असा संताप त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलाय. पोलिसांनी प्रशांत किशोर यांना AIIMS मधून हलवलं असून त्यांना आता नौबतपूर येथे पोलीस घेऊन (arrested)चालले आहेत.

प्रशांत किशोर हे बीपीएससीमधील अनियमिततांविरोधात आमरण उपोषणाला बसले होते. 2 जानेवारीला त्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी आमरण उपोषण सुरु केलं होतं. बिहार लोक सेवा आयोग परीक्षा रद्द करावी, ही त्यांची मागणी आहे. मात्र, आज पहाटे त्यांना स्टेजवरून पोलीस जबरदस्तीने घेऊन गेले आहेत.

पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांना टार्गेट केलं होतं. “तेजस्वी यादव एक मोठे नेते आहेत. ते विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष या नात्याने माझ्याजागी त्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व करायला पाहिजे होतं.”, असं प्रशांत किशोर म्हणाले होते.

हेही वाचा :

क्रिकेटर शिवम दुबे झाला पुन्हा बाबा; गोंडस मुलीला दिला जन्म

…तर आम्ही दिल्लीतील रस्ते प्रियंका गांधींच्या गालांप्रमाणे बनवून दाखवू; भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

झोपलेल्या वाघावर भुंकणे श्वानाला पडले महागात, पुढे जे घडले… थरारक Video Viral