ब्रेकिंग! भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला मिळाली संधी?

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवरील उमेदवार(candidates) जाहीर केले आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदावारी जाहीर झाली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार राज्यात येत्या 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होतील. भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. हे सर्व उमेदवार(candidates) बहुमताने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय जनता पक्षाने पहिल्या यादीत तुलनेने सुरक्षित असणाऱ्या मतदारसंघांची यादी जाहीर केली आहे. यासोबत यात काही खास नावांचाही समावेश केला आहे. यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर माजी केेंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे यानाही भोकरदन विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

तर, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सुभाष देशमुख आणि सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून विजयकुमार देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून सचिन कल्याणशेट्टी यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांवर विश्वास दाखवून भाजपने यावेळीही त्यांना संधी दिली आहे.

हेही वाचा:.

लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाचा सर्वात मोठा खुलासा!

मोठी बातमी! नवनीत राणा यांचं राजकीय पुनर्वसन होणार?

30 विमानांना बाॅम्बच्या धमक्या; केंद्र सरकारकडून पहिला सर्जिकल स्ट्राईक!