राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आमदार अपात्रता(Supreme Court) प्रकरणाची याचिका एकाच दिवशी ऐकू असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांसह त्यांच्यासोबत केलेल्या आमदारांना नोटीस जारी केली आहे. यावर तीन सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाविरोधात(Supreme Court) शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अजित पवार यांच्यासह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. या याचिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.
आजच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने शिवसेना आमदार अपात्र प्रकरण आणि राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरण एकाच दिवशी ऐकू असे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे. पुढची सुनावणी एकापाठोपाठ ऐकू असे म्हणत कोर्टाकडून अजित पवार आणि त्यांच्यासह गेलेल्या आमदारांना नोटीसही पाठवली आहे.
दरम्यान, याप्रकरणी पुढील सुनावणी ही ३ सप्टेंबर रोजी होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी तसेच शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी झालेली नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या सुनावणीत कोर्ट मोठा निर्णय देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
भरवर्गातच शिक्षिकेने घेतली झोप; विद्यार्थिंनींना घालायला लावली हवा video…
कोल्हापूरात पावसाची विश्रांती, पूरस्थिती कायम; शाळा-महाविद्यालयांना आजही सुट्टी
शिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद