BSNL सुपर रिचार्ज! दररोज 3 रुपये पेक्षाही कमी खर्चात 10 महिन्यांचा रिचार्ज

आता फक्त 3 रुपये प्रतिदिवस इतक्या खर्चात BSNL ची 300 दिवसांची स्वस्त अशी रिचार्ज (data)योजना लाँच झाली आहे. वाढत्या रिचार्जच्या खर्चाचा त्रास होत असेल तर मग ही योजना तुमच्यासाठीच आहे.

सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ने एक खास रिचार्ज(data) योजना आणली आहे, जी तुमचे सीम सुमारे 10 महिने चालू ठेवेल, तेही अगदी स्वस्तात. या प्लॅनमध्ये तुम्हाला मोफत कॉलिंग, डेटा आणि एसएमएसची सुविधा मिळतेय. विशेष म्हणजे, ही सुविधा दररोज 3 रुपये पेक्षाही कमी खर्चात मिळतेय.

BSNL ची बजेट फ्रेंडली 300 दिवसांची योजना
या नवीन प्रीपेड रिचार्ज योजनेची किंमत फक्त 797 रुपये आहे आणि ती तुमचे सीम 300 दिवस चालू ठेवते. या योजनेत मोफत कॉलिंग आणि डेटाचा समावेश आहे, पण काही फायदे फक्त सुरुवातीच्या 60 दिवसांसाठीच उपलब्ध आहेत.

रिचार्ज प्लॅनमध्ये काय मिळते?
300 दिवसांची व्हॅलिडिटी हा स्वस्त रिचार्ज प्लॅन तुमचे सीम जवळपासपास 10 महिने चालू ठेवेल.

सुरुवातीच्या 60 दिवसांचे फायदे
भारतातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत अनलिमिटेड कॉलिंग

मोफत राष्ट्रीय रोमिंग

दररोज 2GB मोफत डेटा

दररोज 100 मोफत SMS

60 दिवसांनंतर: सुरुवातीच्या 60 दिवसांनंतर तुम्ही आत येणाऱ्या कॉलवर रिसीव्ह करू शकाल, पण बाहेर जाणारे कॉल, डेटा आणि एसएमएससाठी वेगळी रिचार्ज करावी लागेल.

ही योजना विशेषत: दुसऱ्या क्रमांकाच्या BSNL सिम वापरणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यांत तुम्ही या योजनेतील कॉलिंग आणि डेटाची पूर्णपणे वापर करू शकता. त्यानंतर, उर्वरित 240 दिवसांत तुम्ही आत येणाऱ्या कॉलवर रिसीव्ह करू शकता, त्यासाठी पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. बाहेर जाणारे कॉल आणि डेटासाठी तुम्ही BSNL च्या स्वस्त टॉप-अप योजनांचा पर्याय निवडू शकता.

या योजनेमुळे आता तुम्ही तुमच्या BSNL क्रमांकाचा वापर केवळ कधीतरीच करत असाल, तरीही तो चालू ठेवू शकता. त्यामुळे तुमच्या खर्चातही बचत होईल.

हेही वाचा:

इचलकरंजीत ‘तंदुरुस्त बंदोबस्त’ उपक्रमांतर्गत पोलिसांना पौष्टिक आहार वाटप

PM मोदींचा आज वाढदिवस, 600 हून अधिक भेटवस्तूंचा होणार लिलाव

प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसलेल्या मुलीने आईची हत्या केली