तुम्ही BSNL युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, BSNL ने एक खास प्लॅन(plan) आणला आहे. त्या प्लॅनचा रिचार्ज केल्यास तुम्हाला वारंवार दर महिन्याला रिचार्ज करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे तुम्हाला BSNL ने काही खास बेनिफिट्सही दिले आहेत, प्लॅनविषयी पुढे विस्ताराने वाचा.
BSNL ने इंटरनेट युजर्ससाठी विंटर बोनांझा ऑफर आणली आहे. यावेळी सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL सहा महिन्यांचे मोफत इंटरनेट देत आहे. या प्लॅनअंतर्गत युजर्संना दरमहिन्याला 1300 GB हायस्पीड डेटा मिळेल, जो स्ट्रीमिंग, ब्राउझिंग आणि इतर गोष्टींसाठी परफेक्ट आहे. मात्र, ही ऑफर दिल्ली आणि मुंबई वगळता देशातील बहुतांश भागात उपलब्ध आहे.
केवळ 1 हजार 999 रुपये भरून तुम्ही सहा महिन्यांपर्यंत वेगवान इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. BSNL ची भारत फायबर सेवा तुम्हाला दरमहा 1300 GB पर्यंत 25 Mbps स्पीड देईल. यानंतरही तुम्हाला 4 Mbps चा स्पीड मिळेल. तसेच या काळात तुम्ही घरून हवे तेवढे कॉल करू शकता.
याशिवाय BSNL ने 599 रुपयांचा मोबाईल प्लॅनही(plan) लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये युजर्संना 84 दिवसांची सेवा मिळणार असून, यामध्ये रोज 3GB हायस्पीड डेटा म्हणजेच एकूण 252GB डेटा मिळणार आहे. तुम्ही रोज कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल करू शकता आणि 100 फ्री SMS पाठवू शकता.
याशिवाय BSNL ने नवीन डायरेक्ट-टू-डिव्हाइस (D2D) सेवा सुरू केली आहे. या अभिनव सॅटेलाईट बेस्ड ऑफरमुळे युजर्समोबाइल नेटवर्क नसतानाही कनेक्ट राहू शकतात. आपत्कालीन परिस्थितीत हे विशेषतः उपयुक्त आहे, ज्यामुळे आपण उपग्रहाद्वारे कॉल करू शकता आणि इंटरनेटचा वापर करू शकता.
एक लक्ष्यात घ्या की, BSNL ची इंटरनेट युजर्ससाठी आणलेली विंटर बोनांझा ऑफर ही दिल्ली आणि मुंबई वगळता देशातील बहुतांश भागात उपलब्ध आहे. तुम्हाला दरमहा 1300 GB पर्यंत 25 Mbps स्पीड देईल. यानंतरही तुम्हाला 4 Mbps चा स्पीड यासह स्ट्रीमिंग, ब्राउझिंग आणि इतर गोष्टींसाठी परफेक्ट प्लॅन आहे. दरम्यान, तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजेनुसार हा प्लॅन घ्यावा की नाही, याचा विचार करू शकता.
हेही वाचा :
CM देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप
इचलकरंजी : पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाची दूरवस्था; धोकादायक वळणावर ट्रक पलटी
‘हे अत्यंत मूर्ख क्रिकेट,’ ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजवर संतापला… Video Viral