क्रिकेटच्या महाकुंभाचा बिगुल वाजला; ‘या’ आठ ठिकाणी रंगणार वर्ल्ड कपचा थरार

दक्षिण आफ्रिकेत २०२७मधील एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे(world cup) आयोजन करण्यात येणार असून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील स्थळांवर यजमान मंडळाकडून बुधवारी शिक्कामोर्तब करण्यात आले. जोहान्सबर्गमधील वंडरर्स, डर्बनमधील किंग्समीड, केपटाऊनमधील न्यूलँडस्‌ यासह एकूण आठ ठिकाणी या स्पर्धेच्या लढतींची रंगत पाहायला मिळणार आहे.

दक्षिण आफ्रिकन क्रिकेट(world cup) मंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी फोलेत्सी मोसेकी यांच्याकडून सांगण्यात आले की, आयसीसीकडून आम्हाला ११ स्थळांचे प्रमाणपत्र मिळालेले आहे; पण हॉटेल रूम व विमानतळावर लक्ष देता तीन स्थळांवर लढती न खेळवण्याचा निर्णय आमच्याकडून घेण्यात आला आहे. बेनोनी, जेबी मार्कस ओव्हल व डायमंड ओव्हल या तीन ठिकाणी सामने होणार नाहीत. वंडरर्स, किंग्समीड, न्यूलँडस्‌, सेंच्युरियन पार्क, सेंट जॉर्ज पार्क, बोलंड पार्क, ब्लोमंफाँटेन, बफेलो पार्क या आठ स्थळांना लढतींसाठी निश्‍चित करण्यात आले आहे.

२०२७मधील एकदिवसीय विश्‍वकरंडक तीन देशांमध्ये खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया या तीन देशांमध्ये या स्पर्धेच्या लढती पार पडतील; पण दक्षिण आफ्रिका व झिम्बाब्वे या दोन देशांना मुख्य फेरीत थेट पात्रता देण्यात आली आहे. नामिबियाला मात्र पात्रता फेरीमधून जावे लागणार आहे. नामिबियाला पात्रता फेरीत अपयश आल्यास त्यांना विश्‍वकरंडकात सहभागी होता येणार नाही.

स्पर्धेचे स्वरूप

  • – १४ देशांचा सहभाग
  • – आठ देश आयसीसी क्रमवारीनुसार थेट पात्र
  • – दोन यजमान देशही थेट पात्र (नामिबिया वगळता)
  • – प्रत्येकी सात देशांचे दोन गट
  • – सर्वोत्तम तीन संघ सुपरसिक्स फेरीसाठी पात्र ठरणार
  • – उपांत्य फेरी व अंतिम फेरीच्या लढती

हेही वाचा :

आजचे राशी भविष्य (11-04-2024)

ज्यांना निवडून दिले ते बिनकामाचे निघाले;

गुजरात टायटन्सने रोखली राजस्थानची विजयी वाटचाल