तुम्ही अनेकदा सोशल मीडियावर मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये(buy rice) महिलांना भाजीपाला निवडताना, खूडताना पाहिले असेल. महानगरातील स्त्रीयांना संसार करताना दुहेरी कसरत करावी लागते. धावपळीत लोकलमध्येच त्यांना घरी स्वयंपाकापूर्वीची कामं उरकून घ्यावी लागतात.
मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, चेन्नईसह अनेक शहरात लोकांकडे(buy rice) वेळेची कमी असल्याने हे प्रकार घडतात. काही जणी वेळेची बचत करण्यासाठी रेल्वे स्टेशनजवळ फुटपाथवरुन भाजीपाला खरेदी करतात. आता रेल्वे स्टेशनवरच गृहिणींना स्वस्तात तांदळासह पिठाची खरेदी करता येणार आहे. त्यासाठी रेल्वे मंडळाने परवानगी दिली आहे.
रेल्वे बोर्डाने दैनंदिन धावपळ करणाऱ्या प्रवाशांसाठी ही योजना आणली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात देशातील काही रेल्वे स्टेशनवर योजना राबविण्यात येणार आहे. तांदळासह पिठाची विक्री करण्यात येईल. तांदळासह पिठाची किंमत पण वाजवी असेल. रेल्वेने केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्रालयाच्या मदतीने हा निर्णय घेतला आहे. लवकरच देशातील काही रेल्वे स्टेशनच्या बाहेर स्वस्त दरात प्रवाशांना तांदळासह पिठाचा पुरवठा करण्यात येईल.
भारत आटा आणि भारत तांदूळ हे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने भारतात तांदळासह पिठाची विक्री सुरु केली आहे. भारत आट्याची किंमत 27.50 रुपये प्रति किलो आहे. तर भारत तांदळाचा भाव 29 रुपये किलो आहे. पिठासह तांदळाची विक्री रेल्वे स्टेशन बाहेर करण्याची योजना आहे.
रेल्वे बोर्डाने हा पथदर्शी प्रकल्प सुरु करण्याची तयारी केली आहे. सुरुवातीला हा प्रकल्प केवळ तीन महिन्यांसाठी असेल. जर प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिला. नियोजन चांगले झाल्यास ही योजना कायमस्वरुपी राबविण्याचा विचार आहे. या योजनेतंर्गत संबंधित रेल्वे स्टेशनवर, एक धान्याने भरलेली एक व्हॅन उभी असेल. या रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी दोन तास स्वस्तात तांदळासह पिठाची विक्री करण्यात येईल. तांदळासह पिठाचा दर केंद्र सरकार निश्चित करणार आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर पोलीसांनी सापळा रचून अवैध मद्यसाठा केला जप्त
“त्यानं नखामध्ये ब्लेड लपवलं होतं अन्…”; खिलाडी अक्षनं सांगितला चाहत्यासोबतचा धक्कादायक अनुभव
‘मला माफ करा पण, ‘या’ दोन खेळाडूंसोबत…’, रोहित शर्माने सांगितलं हॉटेल रुम शेअरिंगचं सिक्रेट