ऑक्टोबर महिन्यामध्ये साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला दसरा(Dussehra) हा सण आहे. या दसऱ्याच्या खास प्रसंगी तुम्ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खास महत्वाची माहिती आहे. सुझुकी कंपनीने देखील Suzuki GSX-8R नावाची ही मिडलवेट सुपरस्पोर्ट बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत 9.25 लाख रुपये आहे.
Suzuki कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये ही बाईक प्रथमच दाखवण्यात आली होती(Dussehra). ही बाईक तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केली आहे. ज्यामध्ये मेटॅलिक मॅट स्वॉर्ड सिल्व्हर, मेटॅलिक ट्रायटन ब्लू आणि मेटॅलिक ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. ही बाईक ट्रायम्फ डेटोना 660 आणि कावासाकी निन्जा 660 सह इतर बाईकशी स्पर्धा करू शकते.
या बाइकमध्ये 776 cc लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन आहे जे 78 Nm वर 81.8 hp पॉवर जनरेट करते. त्याचे पॉवर आउटपुट जवळजवळ टाटा पंच सारखे आहे. हे इंजिन सुझुकीच्या V-Strom 800 DE ADV सोबत शेअर केले आहे. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे.
सुझुकी कंपनीने GSX-8R मध्ये पुढील बाजूस ट्विन 310 मिमी डिस्क आणि मागील बाजूस सिंगल 240 मिमी डिस्क देण्यात आली आहे. हे डनलॉप रोडस्पोर्ट 2 रेडियल टायर्ससह 17-इंच चाकांवर चालते. GSX-8R चे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे सुझुकीची इंटेलिजेंट राइड सिस्टीम.
यामध्ये तीन राइडिंग मोड आहेत, ज्यात 4-स्टेप स्विच करण्यायोग्य ट्रॅक्शन कंट्रोल, राइड-बाय-वायर तंत्रज्ञान, ABS आणि लो-RPM असिस्ट सिस्टम समाविष्ट आहे. याशिवाय, यात 5-इंच रंगीत TFT-LCD कन्सोल देखील आहे.
हेही वाचा:
काँग्रेसच्या आमदाराने घेतली शरद पवारांची भेट…
राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर चार दिवसातच मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री बुधवारी कोल्हापुरात
पुन्हा वंदे भारत ट्रेनवर हल्ला! अनेक डब्यांचं नुकसान, खिडकीच्या फोडल्या काचा