मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.5) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला. पण, यामध्ये फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच शपथविधी झाला. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांची नाराजी पाहिला मिळाली. त्यातच महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर सोमवारपासून नागपुरात सुरू होणार आहे. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील नव्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा(Cabinet)विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. बुधवारी दिल्लीत भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून नव्या मंत्र्यांची नावे निश्चित केली जाणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आडमुठेपणा यात अडसर ठरत आहे. कारण शिंदे गृहमंत्रालयाची मागणी सोडायला तयार नाहीत. तर भाजपा त्यांना गृहमंत्रालयाऐवजी नगरविकास खाते देण्यास तयार आहे. त्यामुळे नाराज असलेले शिंदे बुधवारी दिल्लीत न आल्याने मंत्रिमंडळ विस्तारावर दिल्ली दरबारात एकमत होऊ शकले नाही.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार बुधवारी मंत्रिमंडळ(Cabinet) विस्तारासाठी संभाव्य उमेदवारांची यादी घेऊन दिल्लीला जाणार होते. तेथे त्यांची भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक होणार होती. परंतु, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून शिंदे यांनी दिल्लीला जाण्याचा बेत रद्द केला. आता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आडमुठेपणामुळे 14 किंवा 15 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, तर भाजप एकतर्फी निर्णय घेऊ शकते.
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारमंथन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पोहोचले. या बैठकीत नवे मंत्रिमंडळ कसे असेल, यास मंजुरी मिळू शकते, असे मानले जात आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतरही मंत्रालयाच्या विभाजनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. काही दिवसांपासून कोणत्या पक्षाला कोणते मंत्रिपद मिळणार यावर बरीच चर्चा झाली, मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यावेळी बैठकील उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.
हेही वाचा :
भरदिवसा खासदारावर झाडल्या गोळ्या; जागीच मृत्यू
बांग्ला हिंदूंवर कट्टरपंथीयांचे हल्ले भारतात उसळली संतापाची लाट!
शरद पवारांनी तलवारीने केक कापला, राष्ट्रवादीच्या नेत्याने निलेश लंकेंना तलवारीनेच भरवला; VIDEO
भाजपचा मेगा प्लॅन तयार…! पुढील टार्गेट…