प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर ‘कॅन्सल’चा शिक्का

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील (Cancel)आज पहिल्या दिवशी चंद्रपुरातील एका मतदान केंद्रावर राडा झाला. मतदान केंद्रावर काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावासमोर कॅन्सलचा शिक्का मारल्याची गोष्ट समोर आल्याने मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केला.

चंद्रपूर येथील हिंदी सिटी हायस्कूलमधील मतदान केंद्रावर सकाळी मतदानासाठी गेलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्रावर उमेदवारांच्या लावलेल्या यादीवर काँग्रेस (Cancel)उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्याचे आढळले. त्यांनी तेथील बूथ कर्मचारी आणि इतरांना याचा जाब विचारत चांगलाच राडा घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत भाजपकडून पक्षपात केला जात असल्याचा आरोप केला.

नेमका मतदानाच्या दिवशीच काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला गेला, हा शिक्का कुणी मारला, जाणूनबुजून केलेली चूक आहे की, निष्काळजीपणामुळे हे झाले आहे, असा सवाल करत कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱयाला निलंबित करण्याची मागणी केली. अचानक झालेल्या या गोंधळाने केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणली.

हेही वाचा :

मन धोनीनं सामना जिंकला केएलनं!

अरविंद सावंत यांची हॅटट्रिक रोखणार कोणं? शिंदे गटाचं काय ठरलंय?

हिटलर अभी जिंदा है!