कर्करोगावरील औषधं स्वस्त, फरसाणाच्या दरात घट; जीएसटी परिषदेच्या ५४ व्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

केंद्रीय अर्थमंत्री(minister) निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली आज (सोमवार, ९ सप्टेंबर) पार पडलेल्या ५४ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीकडे कंपन्या, उद्योगजगत, तसेच सामान्य नागरिकांचे लक्ष लागले होते.

सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे कर्करोगावरील औषधांवरील जीएसटी कमी करून १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे, ज्यामुळे कर्करोग उपचारांचा खर्च कमी होणार आहे.

याशिवाय, फरसाणावर लागू असलेला जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे, ज्यामुळे फरसाणाच्या दरात घट होईल. बैठकीत विमा पॉलिसी प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्यावर एकमत झाले असले तरी, अंतिम निर्णय पुढील नोव्हेंबर महिन्यातील जीएसटी परिषदेत घेतला जाणार आहे.

ऑनलाइन पेमेंट्सवरील जीएसटीच्या चर्चेबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

हेही वाचा:

“इचलकरंजीत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे आवाहन”

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना खोचक सल्ला: “पक्षाचं नाव शरद पवारांना द्या”

मांडीवर बसवून बळजबरी किस केले; दिग्दर्शकावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप