खुनाच्या गुन्ह्यातील साक्ष मागे घेण्यासाठी मारहाण करून चारचाकी वाहनाचे नुकसान(abuse)केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. उदय नानासो पारडे, अमर नानासो पारडे आणि रणजित विजय पारडे (तिघे रा. जयभीम झोपडपट्टी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद शिवाजी भागवत गरड (वय २७, रा. तारदाळ) यांनी दिली आहे.
गरड हे पत्नीसह जात असताना तिघा संशयितांनी त्यांना अडवत (abuse)शिवीगाळ केली. खुनाच्या गुन्ह्यात साक्ष मागे घे, अशी धमकी देत मारहाण करून दोघांनाही जखमी केले. तसेच गरड यांच्या चारचाकी वाहनांवर दगडफेक करीत नुकसान केले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक नाथा गळवे करीत आहेत.
हेही वाचा :
बच्चूभाऊंची सटकली! शिंदेंची साथ सोडणार? विधानसभा निवडणुकीत ‘इंगा’ दाखवणार
कळंबा कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीची हत्या प्रकरण, 5 कैद्यांना अटक
हृदयद्रावक! कोल्हापुरत भरधाव डंपरची दुचाकीला धडक; पती- पत्नीचा करुण अंत