इचलकरंजीत बँक अधिकाऱ्यांसाह वकिलावर गुन्हा दाखल

इचलकरंजी: बनावट दस्त आणि कागदपत्रे तयार करुन तामिळनाडू बँकेतील(bank) अधिकाऱ्यांच्या संगनमताने १२ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज काढून मिळकतीवर बोजा नोंद करून फसवणूक केल्याप्रकरणी नामांकीत वकीलासह यंत्रमाग उद्योजक व बँकेतील अधिकाऱ्यांसह ९ जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

दरम्यान, जिल्हा न्यायाधिश, बँकेच्या(bank) पॅनेलवरील वकील, महिला पोलीसासह इचलकरंजीतील नामांकित वकीलावर गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत यंत्रमाग उद्योजक मारुती दत्तोबा निमणकर, प्रकाश मारुती निमणकर, राजेश मारुती निमणकर, ऋषिकेश राजेश निमणकर, अभिषेक राजेश निमणकर (सर्व रा.राजाराम रोड), ॲड.एस.एन.मुदगल (रा.बावणे गल्ली), दत्तात्रय पी.म्हातुगडे (रा.कागवाडे मळा), तामिळनाडू बँकेचे तत्कालिन मॅनेजर जी.गणेशकुमार (रा.शिवकाशी ब्रँच विरुदानगर), विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमनिक्कम (सध्या रा.निसर्ग रेसिडन्सी जुना चंदूर रोड, मुळ रा.मदुराई) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणातील फिर्याद ॲड.दिगंबर शंकरराव निमणकर (वय ७५, रा.राजाराम रोड) यांनी दिली आहे.

फिर्यादी ॲड.दिगंबर निमणकर यांच्या मालकीची राजाराम रोड येथे मिळकत आहे. संशयित आरोपी मारुती निमणकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत. नमुद मिळकतीचे टीपी स्कीम 1 अंतर्गत उपसंचालक भूमीअभिलेख पुणे यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या तक्रारीवर उपसंचालकांनी अंतरिम स्थगिती दिली आहे, असे असताना २०२२ ते २०२४ या कालावधीत संशयित मारुती निमणकर (मंगल टेक्स्टाईल) व प्रकाश विव्हींग मिलचे प्रोप्रा. प्रकाश निमणकर, मे.मारुती टेक्स्टाईल व राजेश टेक्स्टाईलचे प्रोप्रा. राजेश निमणकर, ऋषिकेश टेक्स्टाईलचे प्रोप्रा. ऋषिकेश निमणकर, अभिषेक टेक्स्टाईलचे प्रोप्रा. अभिषेक निमणकर यांनी नामांकीत वकील एस.एन.मुदगल व बँकेचे तत्कालिन मॅनेजर जी.गणेशकुमार व विद्यमान मॅनेजर विजयराजन राजमनिक्कम यांना हाताशी धरुन बनावट कागदपत्रे तयार करुन चुकीच्या कार्यपद्धतीने संगनमताने १२ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज बनावट दस्त आणि कागदपत्राद्वारे करुन घेतले.

त्या मिळकतीवर बोजा नोंद केला , ही बाब लक्षात आल्यानंतर ॲड.दिगंबर निमणकर यांनी पोलीसात धाव घेऊन या प्रकरणी नामांकीत वकीलासह ९ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. विशेष म्हणजे यंत्रमाग उद्योजक मारुती निमणकर हे शतक महोत्सवी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनेचे तत्कालिन चेअरमन आहेत.

फिर्यादी ॲड.दिगंबर निमणकर यांच्या मालकीची राजाराम रोड येथे मिळकत आहे. संशयित आरोपी मारुती निमणकर हे फिर्यादीचे चुलत भाऊ आहेत. नमुद मिळकतीचे टीपी स्कीम 1 अंतर्गत उपसंचालक भूमीअभिलेख पुणे यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या तक्रारीवर उपसंचालकांनी अंतरिम स्थगिती दिली आहे.

हेही वाचा :

सरकारच्या ‘या’ भन्नाट योजनेचा लाभ घ्या, 3 लाखांचं कर्ज मिळवा

नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 5.48 टक्क्यांवर, सर्वसामान्यांना दिलासा 

एक चूक जीवावर बेतली! वर्गात चिमुकलीने गिळले पेनाचे टोपण अन् नको ते घडलं…