कर्माने अन् नियतीने डावलले; खासदार मानेंनी शेट्टींना डिवचले

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने(karma) उमेदवार दिल्यानंतर मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. महाविकास आघाडीतच मतांची फूट होणार असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी यांना फटका बसणार शिवाय महायुतीलादेखील त्याचा फायदा होणार, असाच समज खासदार धैर्यशील माने यांचा आहे. त्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देत राजू शेट्टी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचा उमेदवार(karma)सांगलीवरून ठाकरे गट-काँग्रेस भिडले; पटोलेंनी घेतला मोठा निर्णयrma) जाहीर झाला. त्यामुळे राजकीय परिस्थिती बदलेली आहे. चौरंगी लढतीचे चित्र जवळपास मतदारसंघात स्पष्ट झाले आहे. माझी स्पर्धा आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांसोबत आहे. आधीचे स्पर्धक या निवडणुकीतून बाजूला पडले. दोन दगडावर हाथ ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. खासदार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव न घेता टीका केली आहे.

महाविकास आघाडीने उमेदवार दिल्याने त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. मी विकासकामांना घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. मागील मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य या निवडणुकीत घेणार, असा विश्वास खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबद्दल बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी सडकून टीका केली आहे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. ज्या माणसांचा सगळ्याच दगडावर हात होता त्या माणसाला भाजपचा पाठिंबा अपेक्षित होता. काँग्रेस-राष्ट्रवादीची मदत हवी होती, पण स्पर्श नको होता. मशाल चिन्ह नको होतं तर त्यांना शिवसेनेचा पाठिंबा हवा होता. त्याचा परिणाम आज दिसला, त्यांच्यात वैचारिक स्पष्टता नाही. कर्माने आणि नियतीने त्यांना डावलले, अशा शब्दांत खासदार धैर्यशील माने यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा :

ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या चिन्हाचा वाद कोर्टात

ब्रेकिंग! नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध.. सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

5 एप्रिलपूर्वी पूर्ण करा हे महत्त्वाचे काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान