केंद्राचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; शेतकऱ्यांचं होणार भलं

केंद्र सरकारने आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय(gift) घेतला आहे. मनमाड-इंदौर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी(gift) एकूण 7 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. 13,966 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये डिजिटल अ‍ॅग्रीकल्चर मिशनसाठी 2,817 कोटी रुपयांचा समावेश आहे.

या निर्णयांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलले गेले आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेणे अधिक सुलभ होईल आणि त्यांचे अर्थिक सक्षमीकरण होईल.

मंत्री वैष्णव म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वात आधी डिजिटल कृषी मोहिम असून याच धर्तीवर विकसित केले जाणार आहेत. शेतीसाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. डिजिटल प्रकल्पांसाठी एकूण 20, 817 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिजिटल कृषी मिशनची स्थापना करण्यात येणार असल्याचं वैष्णव यांनी स्पष्ट केलंय.

मंत्रिमंडळातील महत्वपूर्ण निर्णय कोणते?
डिजिटल कृषी मोहिमेसाठी 2,817 कोटी रुपयांची मंजुरी
अन्न, पोषण सुरक्षेसाठी 3,979 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी
कृषी शिक्षण, व्यवस्थापन योजनेसाठी 2,291 कोटी रुपयांची मंजुरी
फलोत्पादन योजनेसाठी 860 कोटी रुपये मंजूर
पशुधन आरोग्य व्यवस्थापन योजनेसाठी 71,702 कोटी रुपये मंजूर
कृषी विज्ञान केंद्राच्या विकासासाठी 1,202 कोटी रुपये मंजूर
नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन योजनेसाठी 1,115 कोटी रुपये मंजूर

हेही वाचा:

महाराष्ट्रात चाललंय तरी काय?, 12 तासात रंगला दुसऱ्या खुनाचा थरार

सिद्धांत- मालविकाची रोमँटिक केमिस्ट्री, ‘युध्रा’चे पहिले धमाकेदार गाणे प्रदर्शित

ऐन गणेशोत्सवात लालपरीची चाके थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा उद्यापासून आंदोलनाचा इशारा