आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी (Champions Trophy)सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा शुभारंभ 19 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होत असून यामध्ये आतापर्यंत ५ संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत.
आयसीसीने(Champions Trophy) तात्पुरत्या संघाची घोषणा करण्यासाठी १२ मार्च ही तारीख निश्चित केली होती, परंतु आतापर्यंत ३ संघांनी त्यांचा संघ जाहीर केलेला नाही, ज्यात भारताचा समावेश आहे. भारताव्यतिरिक्त पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेने आपले संघ जाहीर केले नसून, हे संघही लवकरच आपल्या संघांचे अनावरण करतील अशी अपेक्षा आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची सुरुवात १९ फेब्रुवारीपासून होत आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळवली जाणार आहे. राजकीय मुद्द्यांमुळे भारत आपले सर्व सामने यूएईमध्ये खेळणार आहे. उपांत्य फेरीचा सामनाही यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना ९ मार्च रोजी होणार असून त्याचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणाऱ्या ८ संघांची प्रत्येकी ४ गटात विभागणी करण्यात आली आहे. अ गटात भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशचा समावेश आहे. तर ब गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आहेत. यामध्ये काही संघाची संघाची घोषणा केली आहे. यामध्ये कोणत्या संघानी चॅम्पियन ट्रॉफीसाठी संघाची घोषणा केली आहे यावर एकदा नजर टाका.
ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झम्पा.
इंग्लंडचा संघ
जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, लियाम लिव्हिंगस्टोन, साकिब महमूद, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, जो रूट, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक) , मार्क वुड.
न्यूझीलंडचा संघ
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सियर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग.
बांगलादेशचा संघ
नजमुल हुसेन (कर्णधार), तन्झी हसन तमीम, सौम्या सरकार, परवेझ हुसैन इमॉन, मुशफिकुर रहीम, तौहीद हृदयॉय, महमुदुल्लाह, मेहदी हसन, जेकर अली अनिक, रिशाद हुसैन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब, नाहिद राणा, तस्किन अहमद आणि मुस्तफिजूर अहमद. रेहमान
अफगाणिस्तानचा संघ
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरन, रहमानउल्ला गुरबाज, सेदीकुल्लाह अटल, रहमत शाह, इक्रम अलीखिल, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, एएम गझनफर, नूर अहमद, फजलहक फारुकी, फरीद मलिक, नावेद झदरान.
राखीव जागा: दरविश रसूली, नांग्याल खरोती, बिलाल सामी
दक्षिण आफ्रिका- अद्याप पथकाची घोषणा झालेली नाही
भारत- अद्याप पथकाची घोषणा झालेली नाही
पाकिस्तान- अद्याप पथकाची घोषणा झालेली नाही
हेही वाचा :
‘या’ भाज्या वापरून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भोगीची भाजी, पदार्थ होईल चमचमीत
आनंदाची बातमी! सोन्या – चांदीच्या दरात मोठी घसरण, खरेदीपूर्वी वाचा आजचे भाव
आज भोगीच्या दिवशी जुळून आले मोठे शुभ योग; 5 राशींचं नशीब उजळणार, धनलाभाचेही संकेत