लोकसभा निवडणुकीत महायुतीचा(reason daw) पराभव झाला. महाराष्ट्रात अवघ्या 17 जागा महायुतीला मिळाल्या. कोल्हापूर मतदारसंघातील संजय मंडलिक यांचा पराभव देखील महायुतीच्या जिव्हारी लागली आहे. या पराभवाचे कारण शोधण्यासाठी मंत्री चंद्रकात पाटील यांनी बैठकींचा धडाका लावला आहे.
बैठकीला स्वतः चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, समरजीत सिंह घाटगे आदी (reason daw)उपस्थित होते. चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघ निहाय आढावा घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आपल्या उमेदवाराला कोणत्या बूथवर कमी मताधिक्य मिळाले, पराभवाची नेमकी कारण कोणती ? आणि कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेण्यासाठी बैठक शिवाय विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने मताधिक्य वाढवता येईल यावर बैठकीत चर्चा केली.
लोकसभेतील पराभवामुळे चंद्रकात पाटील सावध झाले आहेत. अवघ्या पाच सहा महिन्यांवर असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आत्ताच तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक विधानसभा निहाय आढावा घेत महायुती कुठे कमी पडली, याचा शोध घेतला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघात 25 वर्षानंतर काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार संजय मंडलिक यांचा तब्बल 1 लाख 53 हजार 309 मतांनी पराभव केला.
हेही वाचा :
मराठा आंदाेलकांचा रास्ता राेकाे, 3 तासांपासून वाहतुक खाेळबंली
ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन-मलायकामध्ये ‘पोस्ट वॉर’
“वहिनी का चिडल्या?”; भारतविरुद्ध पाक सामन्यादरम्यानचा अनुष्काचा व्हिडीओ Viral