इचलकरंजी गणेश विसर्जनानिमित्त एसटी वाहतूक मार्गात बदल

इचलकरंजी: उद्या मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे गणेश(st) विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक विसर्जनामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजवाडा चौकात एसटी(st) बसेसच्या मार्गांमध्ये देखील बदल केले आहेत.

सांगली, मिरज आणि जयसिंगपूर येथून येणाऱ्या एसटी(st) बसेस बिग बाजार चौकातून थोरात चौकाकडे वळवल्याने प्रवाशांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे राजवाडा येथे उतरणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, त्यांना अनावश्यक आर्थिक भार सोसावा लागत आहे.

या तक्रारींची तातडीने दखल घेत एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक यांनी सर्व बसेस सांगली वेस मार्गे मारुती मंदिर चौकातून थोरात चौकाकडे वळवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने यासाठी आवश्यक त्या सूचना तत्काळ जारी केल्या आहेत.

हेही वाचा:

छगन भुजबळ सांगत आहेत अंतरवालीचे पवार कनेक्शन

शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, ‘या’ नेत्याची जहरी टीका

…आणि ऐश्वर्या- आराध्यानं कॅमेरासमोरच एकमेकिंना किस केलं