‘या’ जागांवरील उमेदवारीसाठी महायुतीत चुरस; गृहक्लेश संपेना

तिथं महाविकासआघाडीकडून (lead)काही जागांवर उमेदवारांची नावं निश्चित केली जात असतानाच इथं महायुतीमध्ये मात्र काही जागांवरून मतभेद पाहायला मिळत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख उलटून गेली असली तरीही राज्याच्या काही मतदारसंघांमधील जागावाटपाचा (lead)पेच मात्र राज्यातील मोठ्या पक्षांना सोडवता आलेला नाही. त्यातच काही नव्या उमेदवारांना संधी मिळाल्यामुळं प्रस्थापित आणि विद्यमान खासदारपदी असणाऱ्या कैक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी पक्षात बंड करण्याची तयारी दाखवली आहे.

नेहमीच विधानसभा निवडणुकींसाठी स्वारस्य दाखवणाऱ्या अनेक नेत्यांनी यावेळी दिल्लीदरबारी जाण्यात रसदाखवल्यामुळं उमेदवारीवरून महायुतीपासून महाविकासआडीपर्यंत चुरस पाहायला मिळत आहे. महायुतीतही 9 जागांचा तिढा अजूनही कायम असून, मुंबईतल्या 3 जागांसह ठाणे, नाशिक, संभाजीनगरात उमेदवार ठरेना, वर्षावर आज महत्त्वाच्या बैठकांची सत्र होताना पाहायाला मिळणार आहेत.

आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाच्या बैठका
तिन्ही पक्षांची कसोटी पाहणारा जागावाटपाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी, मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा बंगल्यावर महत्त्वाच्या बैठका बोलावल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत यामध्ये ठाणे, रत्नागिरी, नाशिक लोकसभेचा प्रश्न सोडवण्यासाठी बैठका होणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री यावर काय तोडगा काढतात याकडे आता लक्ष लागलंय.

हेही वाचा :

सांगलीवरून ठाकरे गट-काँग्रेस भिडले; पटोलेंनी घेतला मोठा निर्णय

कर्माने अन् नियतीने डावलले; खासदार मानेंनी शेट्टींना डिवचले

5 एप्रिलपूर्वी पूर्ण करा हे महत्त्वाचे काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान