…तर माझ्यावरही गुन्हे दाखल करा; सांगलीत रोहीत पाटील यांनी पोलीस ठाण्यात मांडला ठिय्या

पाण्यासाठी बिरणवाडी येथे पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी(police) ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे रोहित आरआर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.

शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर माझ्यावर देखील गुन्हा दाखल करावा अन्यथा पोलीस(police) ठाण्यातून हलणार नाही, अशी भूमिका रोहित पाटील यांनी घेतली आहे.

सावळजसह परिसरातील शेतकऱ्यांनी पुणदी सिंचन योजनेतून पाणी मिळावे, या मागणीसाठी शेतकरी आंदोलन करीत होते. आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रोहित पाटील थेट पोलीस ठाण्यातच गेले, यावेळी आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दीक वाद झाली.

सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. तीन ते चार किलो मीटर दूरवरून गावातील लहान मुले, महिला पाण्यासाठी कडक उन्हात पायपीट करीत आहेत. चार किलो मीटर दूर असलेल्या या विहिरीत जीव धोक्यात घालून पाणी काढावं लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाझर यालाव आणि विहीर पूर्णतः अटल्या आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळ निवारणासाठी प्रशासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आदेश दिले असले तरी अद्याप सांगली जिल्हा प्रशासन या गावापर्यंत पोहचले नाही. शासनाने पाण्याची समस्या दूर करावी अशी मागणी येथील रहिवासी करीत आहेत.

हेही वाचा :

7 तासांत 15 निष्पाप मुलांचा बळी; सरकारी यंत्रणा ठरतेय फेल…

एक शो दोन विजेते, ‘Dance Deewane 4’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं

वीस वर्षांपूर्वी निधन झालेल्या ‘या’ अभिनेत्रीसारखी हुबेहूब दिसते आराध्या