भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या कार(car) उपलब्ध आहेत, जर तुम्ही किफायतशीर आणि चांगले मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी अनेक ऑप्शन्स तुमच्यासमोर उपलब्ध आहेत.
जसे की, Kia Syros चे बुकिंग 2 जानेवारीच्या मध्यरात्री पासून बुकिंग सुरु झाले आहे. ही कार(car) खरेदी करणारे ग्राहक 25,000 रुपयांची टोकन रक्कम भरून ऑनलाइन बुक करू शकतात किंवा डीलरशिपला भेट देऊ शकतात. सध्या त्याची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही, पण त्याची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपयांच्या आत असेल असं सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 1 फेब्रुवारीला ते पूर्णपणे लॉन्च करणार आहे. म्हणजेच 1 फेब्रुवारीला Kia Syros च्या किमती जाहीर होतील. त्याच वेळी, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बुकिंग केलेल्या ग्राहकांना त्याची डिलिव्हरी दिली जाईल. 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्येही सिरोस हे सादर करणार आहेत.
मल्टी इंजिन पर्याय उपलब्ध असतील
Kia Syros SUV मध्ये 1 लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम इंजिन आहे. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. डिझेल प्रकारात 1.5 लीटर डिझेल इंजिन दिले जाईल जे Sonet, Seltos आणि Kia Syros ला पॉवर देते. Syros मधील डिझेल 116 bhp कमाल पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क निर्माण करते.
लक्झरी इंटीरियरने सुसज्ज
किआने या एसयूव्हीचे नाव ग्रीक बेटावर ठेवले आहे. ही नवी एसयूव्ही अधिक प्रशस्त बनवण्यात आली आहे. यात एलईडी लाइट्स, एलईडी डीआरएल, पॅनोरॅमिक सनरूफ, एलईडी टेल लाइट्स, ॲम्बियंट लाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, टेरेन आणि ड्रायव्हिंग मोड्स, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम आहे.
सुरक्षिततेसाठी लेव्हल-2 ADAS
सुरक्षेसाठी, या SUV मध्ये लेव्हल-2 ADAS, 6 एअरबॅग्ज स्टँडर्ड, ABS, EBD, Isofix चाइल्ड अँकरेज सारख्या उत्कृष्ट फीचर्स देण्यात आल्या आहेत. किआ सिरोस हे सेल्टोस आणि सोनेट दरम्यान स्थित आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या यापैकी दुसरी कोणतीही SUV नाही. रिपोर्टनुसार, त्याच्या बेस टर्बो ट्रिमची एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपये असू शकते, जी टॉप वेरिएंटसाठी 15 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.
किआ सिरोसचे प्रतिस्पर्धी मॉडेल
याचा अर्थ असा की सिरॉस सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची उच्च ट्रिम शोधत असलेल्या ग्राहकांना लक्ष्य करेल. Kia Seltos, Hyundai Creta, Honda Elevate, Maruti Suzuki Grand Vitara, Skoda Kushaq, Volkswagen Taigun, Toyota Urban Cruiser Hider आणि इतर सारख्या कॉम्पॅक्ट SUV चे एंट्री लेव्हल प्रकार शोधत असलेले ग्राहक आहेत.
हेही वाचा :
“पुढील तीन महिन्यात सरकार पडणार म्हणजे पडणार”, शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा
अथिया शेट्टीने चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा; शेअर केला बेबी बंपचा फोटो
उद्धव ठाकरे गटावर घाला; माजी महापौरांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश