बड्या नेत्यांच्या बॅगा तपासणे एक उपचार, आचारसंहितेचा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा, विधानसभा या कायदेमंडळांच्या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक प्रस्थापित राजकीय पक्षाचे बडे नेते हे प्रचाराच्या निमित्ताने राज्यभर फिरत असतात. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी या नेत्यांच्याकडून प्रवासासाठी खाजगी हेलिकॉप्टर(helicopter ride), छोटी विमाने यांचा वापर केला जातो. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त गावात जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा तो एक सहज उपलब्ध असणारा पर्याय आहे. हेलिकॉप्टर किंवा छोटी विमाने यातून उमेदवारांना आर्थिक रसद पुरवली जाऊ शकते म्हणून त्याची तपासणी सध्या केली जात आहे. आक्षेप घ्यावे असे काही नाही.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची(helicopter ride) मराठवाड्यातील एका गावात हेलिपॅड वरच तपासणी केली होती. त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या होत्या. अशा प्रकारची तपासणी करणे हा केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला अधिकार आहे आणि हा अधिकार अलीकडे प्रभावीपणे वापरला जाऊ लागला आहे. आत्तापर्यंत अशा प्रकारच्या तपासणीतून भरारी पथकाला अवैध असे काहीही सापडलेले नाही. नोटांची बंडले असणाऱ्या बॅगा सापडलेल्या नाहीत. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात कोट्यावधी रुपयांची रोकड, कोट्यावधी रुपयांचे सोने, मद्य, हे ताब्यात घेण्यात आले आहे.

फोर व्हीलर गाड्यांची तपासणी करताना हे मौल्यवान ऐवज सापडलेले आहेत. आचारसंहितेच्या काळात निवडणूक अधिकाऱ्यांनी तसेच भरारी पथकांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बड्या नेत्यांच्या हेलिकॉप्टर्स(helicopter ride)व छोटी विमाने यांची तपासणी केली जात आहे. गेल्या आठवड्यात उबाठा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे हेलिकॉप्टर मधून प्रचारासाठी जात असताना हेलिपॅड वर त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. सलग दोन वेळा त्यांच्या बॅगांची तपासणी झाल्यानंतर ते काहीसे संतप्त झाले होते.

तुम्ही माझ्या बॅगा तपासल्या याबद्दल माझी कोणतीही हरकत नाही पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सुद्धा बॅगा तपासल्या पाहिजेत. अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांची ही मागणी प्रथम दर्शनी योग्य असली तरी, पंतप्रधानांच्या बॅगेची तपासणी करणे याचा अर्थ पंतप्रधानांच्या वर अविश्वास दाखवणे असा आहे. आणि त्यांची बॅग तपासली तर जगात त्यांच्याविषयीचा एक वेगळा संदेश जाऊ शकतो.

भारतीय निवडणुकीच्या इतिहासात पंतप्रधान पदावरील व्यक्तीची निवडणूक काळात तपासणी झालेले एकही उदाहरण नाही. मुळातच पंतप्रधानांची एक वेगळी सुरक्षा यंत्रणा असते आणि या यंत्रणेकडून सर्व प्रकारची तपासणी स्वतंत्रपणे होत असते आणि त्याची कल्पना पंतप्रधानांना नसते.

निवडणूक प्रचार काळात बड्या नेत्यांच्या वाहनांची तपासणी करणे, त्यांच्या बॅगा तपासणे हा आचारसंहितेच्या उपचाराचा एक भाग असतो. त्याचे भांडवल केले जाऊ नये. उद्धव ठाकरे यांच्या सलग दोन वेळा बॅगा तपासल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांच्याही बॅगा भरारी पथकांच्या अधिकाऱ्यांकडून तपासल्या गेल्या आहेत. त्यांनी याबद्दल नाराजी किंवा खळखळ व्यक्त केलेली नाही.

आचारसंहिता राबवणार्‍या यंत्रणांकडून सध्या बड्या नेत्यांच्या बॅगांची तपासणी सुरू असली तरी तो एक फार्स आहे असे म्हणावे लागेल. कारण विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात आचारसहितेच्या नियमांना पायाखाली घेऊन उमेदवारांच्या प्रचार यंत्रणांकडून व्यवहार सुरू आहेत. भोजनावली तर सर्रास सुरू आहेत. गल्लीची यात्रा, गावची यात्रा, जावळ, वाढदिवस आदि कारणे सांगून सामिष भोजनावळी सुरू आहेत.

कार्यकर्त्यांना विशिष्ट हॉटेल्स ची भोजनाची कुपने मतदारांना दिली जाऊ लागली आहेत. गेल्या रविवारी असा एकही विभाग न होता किती ते पंगती उठलेल्या नाहीत. प्रचार यंत्रणांच्या कडून कार्यकर्त्यांना तसेच अल्प उत्पन्न गटातील लोकांना पैसे वाटप सुरू आहे. आपल्या मराठीत एक म्हण आहे आणि ती म्हणजे “न्हानीला बोळा, आणि दरवाजा मोकळा”. असा काहीसा प्रकार बऱ्याच भागात दिसतो आहे.

हेही वाचा :

नितीन गडकरींवर विरोधक टीका का करत नाहीत? स्वतःच दिलं उत्तर

विद्यार्थ्यांनी बालदिनी शाळेत करा ‘हे’ भाषण, टाळ्यांचा कडकडाट थांबणार नाही!

आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर ‘तो’ हॉस्पिटलच्या लॉबीमधून