महायुतीचा मंत्रिमंडळ(latest political news) विस्तार 15 डिसेंबरला पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळ विस्तारात संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या या नाराजीनानंतर छगन भुजबळ हे आज मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे ते नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार छगन भुजबळ(latest political news) यांना महायुतीच्या मंत्रीमंडळात मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत. कारण छगन भुजबळ हे महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नागपुरचं हिवाळी अधिवेशन सोडून ते तडकाफडकी नाशिकला रवाना झाले होते. मात्र त्यानंतर त्यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठका देखील घेतल्या होत्या. याशिवाय भुजबळांनी नाशिकमध्ये ओबीसींचा मेळावा देखील घेतला होता.
मात्र या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर आज छगन भुजबळ हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. कारण आमदार छगन भुजबळ हे उद्या आणि परवा देशातील व राज्यातील अनेक महत्त्वाच्या ओबीसी नेत्यांना देखील भेटणार आहेत. त्यामुळे आता ते नेमका काय निर्णय घेणार आहेत याकडं अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमदार छगन भुजबळ यांच्याबाबत जे काही घडलं ते भुजबळ ओबीसी असल्यामुळे घडत असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. तसेच छगन भुजबळांनी देखील मंत्रिपद नाकारल्यामुळे स्वतःच्या पक्षा विरोधात देखील आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
परंतु, आमदार छगन भुजबळ आगामी काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार की वेगळा काही पर्याय निवडणार हे मात्र पुढील 2 ते 3 दिवसांत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ नेमका काय निर्णय घेणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
बाईकवर आले, हातात 10 मोबाईल; संजय राऊतांच्या घराबाहेर काय घडलं?
रेकॉर्डब्रेक ‘पुष्पा 2’ ला उत्तर भारतीय सिनेमागृहातून हटवले?
काँग्रेस कार्यालयावरील हल्ल्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक; आमदारांची जोरदार घोषणाबाजी