छगन भुजबळांना मिळणार मोठी जबाबदारी; भाजपच्या बड्या नेत्याचे सूचक विधान

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते(leader) छगन भुजबळ यांच्या नाराजीची चर्चा केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. ओबीसींचे राज्यातील सर्वात मोठे नेते असल्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळणारच अशी सर्वांनाच खात्री होती. पण रविवारी नागपुरात झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी शपथ घेतली.

पण शेवटपर्यंत त्यांचे नाव आले नाही. त्यामुळे भुजबळांनासारख्या ताकदीच्या नेत्यालाच(leader) मंत्रिमंडळातून बाहेर कसे ठेवण्यात आले, याचा सर्वांनाच ध्क्का बसला होता. त्यांच्या समर्थकांकडूनही याचा निषेध करण्यात आला. अशातच छगन भुजबळांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. छगन भुजबळांना सर्वात महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. अशी माहिती राजकीय गोटातून समोर आली आहे.

भाजप आमदार आशिष देशमुख यांनी छगन भुजबळांबाबत मोठा दावा केला आहे. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसले तरी भुजबळांना राज्यपालपद मिळणार आहे. याबाबत महायुतीच्या नेत्यांकडून चर्चा सुरू आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणत्याही आमदारांमध्ये नाराजी नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

आशिष देशमुखांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू होणार आहेत. याचे कारण म्हणजे, आजही महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ यांची ताकद आहे. राज्यातील मोठा ओबीसी वर्ग त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत छगन भुजबळ राज्यपाल पद स्वीकारणार का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, मंत्रिपद न मिळाल्यामुळे गेल्या छगन भुजबळ यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. अधिवेशनाला हजर न राहता ते पहिल्याच दिवशी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये दाखल झाले होती. नाशिकच्या भुजबळ फार्म आणि त्यांच्या येवला मतदारसंघातील कार्यालयात कार्यकर्त्यांशी भेटून त्यांनी संवाद साधला.

दुसरीकडे, भुबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थकही चांगलेच आक्रमक झाले होते. ओबीसी संघटना थेट रस्त्यावर उतरल्या, काही ठिकाणी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेलाही जोडे मारण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ काय निर्णय घेतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्याचवेळी राष्ट्रवादीच्याही अनेक नेत्यांना छगन भुजबळांना मंत्रिपद मिळावे, अशी इच्छा होती. पक्षातील बहुतांश आमदारांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ओबीसी मते खेचून आणण्यात भुजबळांनी मोठी कामगिरी केली. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळात त्यांचे स्थान जवळपास निश्चित मानले जात होते.

पण ऐनवेळी भुजबळांना डावलून त्यांच्यावर अन्याय झाला, अशी प्रतिक्रीयाही अनेकांनी दिली. त्यातच आता राज्यात महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यास या निवडणुकांमध्ये मोठा फटका बसू शकतो, अशी भिती राष्ट्रवादीच्या आमदांरांनी व्यक्त केल्याची माहिती आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी

‘मंत्री करा, अन्यथा..’, ‘या’ आमदारासाठी शिंदे गटात सामूहिक राजीनाम्याची तयारी?

आज 12 पैकी कोणत्या राशीला मिळणार धन व समृद्धी