पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन (greetings)करताना त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला आणि महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना त्यांनी शिवरायांना आपले आराध्य दैवत म्हणून मानले. एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली आणि सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आपल्याला सदैव प्रेरणा देतात. शिवरायांचा अपमान कधीही सहन होणार नाही, असेही मोदींनी यावेळी स्पष्ट केले.
शिवरायांच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करताना मोदींनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श आपण कायम ठेवू आणि त्यांच्या आदर्शांनुसार देशाची सेवा करणार आहोत. पंतप्रधानांनी शिवरायांचे योगदान आणि त्यांचे स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हे देशभरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
हेही वाचा:
सुनील महाजन युवा शक्ती व रवींद्र माने युथ फोर्स आयोजित दहीहंडी स्पर्धेत उत्साहाचा कळस
पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला आंदोलनाचे ग्रहण
इचलकरंजीत खाकी वर्दीतील हफ्तेखोरी: पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?