दिवाळीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

लखनऊ : उत्तरप्रदेशमध्ये नागरिकांना दिवाळीची मोठी भेट देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून दिवाळीच्या निमित्ताने सर्वांना चोवीस तास मोफत वीज(electricity) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेश सरकारच्या या नव्या घोषणेमुळे नागिरकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी संध्याकाळी जिल्हा दंडाधिकारी, विभागीय आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेत अधिकाऱ्यांना दिवाळी सणाबाबत काही निर्देश दिले आहे. हिंदू सण उत्साहामध्ये साजरे करता यावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या आहेत. 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत राज्यात वीजपुरवठा(electricity) खंडित होऊ नये. सणांच्या आनंदाच्या आणि उत्सवाच्या या काळात 28 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात 24 तास अखंड वीज पुरवठा व्हावा. यासाठी वीज महामंडळाने आवश्यक ती तयारी करावी.” अशा सूचना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

याबाबत अधिकची माहिती देताना योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, सणांच्या काळामध्ये आपत्कालीन आरोग्य सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू ठेवाव्यात. गाव असोत किंवा शहरे, सर्वच भागात डॉक्टर सहज उपलब्ध असले पाहिजेत. सणांच्या काळात खाद्यपदार्थ भेसळीचे प्रकार वाढतात.

त्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. यासाठी सणांच्या पार्श्वभूमीवर अन्नसुरक्षा तपासणी अधिक तीव्र करावी, पण तपासणीच्या कारणाने कोणाचाही छळ होणार नाही याचीही काळजी घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत.

त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यात यावी असे देखील आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. योगी आदित्यानाथ म्हणाले की, “खराब अवस्था असणाऱ्या बसेस रस्त्यावर धावू देऊ नयेत. कडक कायदा आणि सुव्यवस्था, राखण्यात यावी. समाजातील सर्व घटकांकडून सहकार्य यावर भर दिला जावा. तसेच पोलिसांना चोवीस तास हाय अलर्ट रहावे.

रक्षाबंधन असो, श्री कृष्ण जन्माष्टमी, दुर्गा पूजा, दसरा, श्रावणी यात्रा असो किंवा ईद, बकरीद, बाराफत आणि मोहरम सारखे सण असो, प्रत्येक सणाच्या वेळी सकारात्मक वातावरण असले पाहिजे. यासाठी जनतेचे सहकार्य कायम राहिले पाहिजे, असे मत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?

क्षणार्धात मृत्यूने गाठलं! तरुणाने अचानक काही सेकंदातच मित्रांसमोर सोडले प्राण Video

मोठी बातमी ! भाजपला विधानसभा निवडणुकीपूर्वीच धक्का; ‘या’ माजी खासदाराने सोडली साथ