राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)येत्या २० ते २४ जानेवारी या काळात दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. ते १९ जानेवारीला दावोससाठी रवाना होतील.

या दौऱ्याच्या निमित्ताने विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमआयडीसी , एमएमआरडीए , सिडकोचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासोबत असतील.
फडणवीस (Devendra Fadnavis)हे तिसऱ्यांदा दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होत आहेत. यापूर्वी त्यांनी केलेल्या दावोस दौऱ्यात डेटा सेंटर्स , ऑटोमोबाईल्स , सेमीकंडक्टर , इव्ही , इलेक्ट्रॉनिक्स , स्टील , अन्नप्रक्रिया , वस्त्रोद्योग , औषधी आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीसाठी प्रयत्न केले होते.
या दौऱ्यातही वरील क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येने सामंजस्य करार (Memorandum of Understanding) होण्याची शक्यता आहे. या माध्यमातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्याचा आणि रोजगार निर्मितीचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.

या दौऱ्यातून महाराष्ट्रासाठी भरीव गुंतवणूक आणण्यात मुख्यमंत्री यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :
आज सोन्याचे आणि चांदीचे भाव किती? ताज्या अपडेट्स
पैसे परत करावे लागण्याच्या भीतीने 4000 लाडक्या बहिणींची माघार, अदिती तटकरेंचं मोठं वक्तव्य
VIDEO : नागासांधूचा तांडव! कुंभमेळ्याला अंधविश्वास म्हणणाऱ्यांची नागा साधूंनी जिरवली