मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार महामंडळ स्थापन करण्याची घोषणा; पत्रकार संघटनेचा पाठपुरावा यशस्वी

मुंबई: पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री(Minister) एकनाथ शिंदे यांनी घेतला असून, या घोषणेमुळे राज्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय आज जाहीर झाला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

महाबळेश्वर येथे झालेल्या ऐतिहासिक अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री(Minister) एकनाथ शिंदे यांनी पत्रकार महामंडळ स्थापनेचा शब्द दिला होता, जो आज प्रत्यक्षात आणला गेला आहे. यापूर्वी कनेरीमठ-कोल्हापूर अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही या विषयावर आश्वासन दिले होते. त्यामुळे पत्रकार वर्गातील मागण्यांवर सरकारने दिलेला शब्द पाळल्याबद्दल राज्यभरात पत्रकारांनी समाधान व्यक्त केले आहे.

संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख, आणि मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांची यामध्ये महत्वपूर्ण भूमिका राहिली. या निर्णयामुळे राज्यातील पत्रकारांना त्यांचे हक्क मिळविण्याची नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महामंडळाच्या स्थापनेमुळे पत्रकारांच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक हितांच्या संरक्षणासाठी एक प्रभावी व्यासपीठ निर्माण होईल, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.

हेही वाचा:

देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारचा ‘घर घर संविधान’ उपक्रम

नवरात्रीचा आज नववा दिवस, देवी सिद्धिदात्री ‘या’ राशींना पावणार!

‘सिंघम अगेन’च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल, अर्जून कपूरवरही भडकले प्रेक्षक