कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाविकास आघाडी कडून एका वेगळ्या पातळीवरून(political) ज्या योजनेची उपहासात्मक चर्चा सुरू करण्यात आली होती ती”मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण “योजना कार्यान्वित झाली आहे. पहिल्या टप्प्यात अर्ज मंजूर झालेल्या राज्यातील महिलांच्या बँक खात्यावर तीन हजार रुपयांची रक्कम शुक्रवारपासून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सरिता कांबळे ह्या महिला पहिल्या लाभार्थी ठरल्या असून “लई भारी वाटतंय” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
ही योजना राजकीय हेतूने प्रेरित आहे आणि ती विधानसभा निवडणुका (political)नजरेसमोर ठेवून जाहीर करण्यात आली आहे अशी टीका विरोधी पक्षांकडून करण्यात येत होती आणि ती अगदीच चुकीची आहे असे कोणी म्हणणार नाही. जाहीर करण्यात आलेल्या काही कल्याणकारी योजनांचा लाभ मतपेटीच्या अर्थात ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून झाला पाहिजे अशी सत्ताधाऱ्यांना अपेक्षा असतेच, पण प्रत्यक्ष अपेक्षित इतका लाभ मिळतोच असे नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी राज्यातील महिलांना सरसकट एसटी प्रवास तिकिटात 50% सवलत दिली होती आणि आजही ही सवलत सुरू आहे. या योजनेचे स्वागत राज्यातील महिलांनी केले होते. लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्याच्या हेतूने, ही योजना जाहीर केली होती मात्र या योजनेचा प्रत्येक्ष अपेक्षा इतका लाभ महायुतीच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत झाला नाही हे वास्तव आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावर दरमहा दीड हजार रुपये जमा केले जाणार आहेत. प्रत्यक्ष आर्थिक लाभ महिलांना मिळणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते स्वस्थ झालेले दिसले. ही योजना फक्त निवडणुकीपुरती मर्यादित आहे. ती कायमस्वरूपी नाही असे वक्तव्य विरोधी नेत्यांच्याकडून केले जात होते. या योजनेला सावत्र भाऊ विरोध करत आहेत असा पलटवार सत्ताधारी महायुतीकडून केला गेल्यानंतर विरोधी नेत्यांची भाषा आता मवाळ बनली आहे.
जनतेचाच पैसा आहे, त्याचा लाभ घ्या, आम्ही सत्तेवर आलो तर आणखी ज्यादा रक्कम देऊ असे त्यांच्याकडून सांगितले जाऊ लागले आहे. महिलांच्या खात्यावर रोख रक्कम जमा होत जाणार असल्यामुळे सत्ताधाऱ्यांना त्याचा थेट लाभ येत्या विधानसभा निवडणुकीत होईल अशी भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. म्हणूनच ही योजना फार काळ टिकणार नाही अशी भाषा त्यांच्याकडून सुरू होती. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही योजना कायमस्वरूपी असणार आहे असे ठामपणे सांगितले आहे. एकूणच या योजनेचा लाभ विद्यमान सत्ताधारी असलेल्या महायुतीला होऊ शकतो.
या योजनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला (political)फटकारल्यामुळे या योजनेविषयी अनिश्चितता निर्माण झाली होती, पण अनिश्चिततेचे ढग आता निवळले आहेत. विकास योजनांसाठी शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला राज्य शासनाने दिला नसल्यामुळे एका शेतकऱ्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देता येत नसेल तर तुमची लाडकी बहीण योजना रद्द करण्यात येईल.
या योजनेसाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि नुकसान भरपाई देण्यासाठी पैसा नाही हे योग्य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. त्याआधी ही योजना म्हणजे शासनाच्या पैशाची उधळपट्टी आहे, ही योजना रद्द करावी किंवा तिला स्थगिती द्यावी अशी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती मात्र राज्य शासनाच्या अधिकारात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही असे मत व्यक्त करून ही याचिका फेटाळण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने काही मतप्रदर्शन केल्यामुळे अनिश्चितता निर्माण झाली होती.
अतिशय वेगळ्या प्रकारची ही लाडकी बहीण योजना असून या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवण्यासाठी त्याचे निकष अगदी साधे आणि सुटसुटीत ठेवण्यात आले आहेत. कागदपत्रांच्या चक्रव्यूहात ही योजना नसल्यामुळे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेले अर्ज किरकोळ अपवाद वगळता मंजूर करण्यात आले आहेत.
अर्ज मंजूर प्रक्रिया सुद्धा सुटसुटीत आहे. दर महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या(political) खात्यावर जमा होणार आहेत. ही रक्कम तशी फार मोठी नाही, पण या रकमेतून प्रापंचिक किरकोळ अडचणी दूर होतात हे सुद्धा खरे आहे. ही योजना जाहीर केल्यानंतर अर्थ विभागातील वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी तसेच राज्यातील काही अर्थतज्ज्ञांनी या योजनेला अप्रत्यक्ष विरोध केला होता.
राज्य शासनावर असलेले एकूण कर्ज, आणि या योजनेवर होणारा खर्च याचे तपशील देऊन या योजनेच्या व्यवहार्यतेबद्दल शंका व्यक्त करण्यात आली होती. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांनीही या योजनेचे जोरदार समर्थन केले आणि आता ही योजना कार्यान्वित सुद्धा झाली आहे. थेट रोख स्वरूपात लाभ दिल्या जाणाऱ्या या योजनेचा
राज्यकर्त्यांना पुन्हा सत्तेवर येण्यासाठी लाभ होतो का हे पाहावे लागेल आणि त्यासाठी निवडणूक निकालापर्यंत प्रतिक्षा करावी लागेल.
हेही वाचा :
सूरज चव्हाणला सेलिब्रिटींचा फुल सपोर्ट, ‘गुलिगत किंग’साठी खास पोस्ट
वाहतूक पोलिसांचं प्रसंगावधान अन् महिलेचा वाचला जीव; पाहा अटल सेतूवरचा थरारक Video
बंदूक काढली अन् स्वत:वर गोळी झाडली, कर्मचाऱ्यांसमोरच व्यापाऱ्याचं धक्कादायक पाऊल