सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओज व्हायरल(viral) होत असतात. यातील अनेक व्हिडिओज आपल्याला हसवतात तर काही आपल्याला थक्क करून जातात. यात अनेकदा काही अपघातांचे व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात. सध्या असाच एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यातील दृश्ये पाहून तुमचे काळीज पिळवटुन निघेल. या व्हिडिओमध्ये रस्त्याने धावत असताना चिमुकलीला ट्रकने चिरडल्याचे दिसून येत आहे.
अनेकदा लहान मुले आपला माजमस्तीत आजुबाजुच्या स्थितीचा विचार करत नाहीत. अशात पालकांनी लहान मुलांची काळजी घेणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे फार गरजेचे असते. लहान मुलांना कधीही रस्त्याच्या जवळ जाऊ देऊ नये. पालकांच्या एका चुकीमुळे मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो. एक चूक आपल्याला किती महागात पडू शकते याचे उत्तम उदाहरण आजच्या या व्हायरल(viral) व्हिडिओतून दिसून येते.
सदर घटना उज्जैनमधील आहे. व्हिडिओमध्ये दिसून येते की, एका धावत्या रस्त्याच्या कडेला मस्ती करत धावत आहे. यानंतर ही चिमुकली धावत धावत अचानक चालू रस्त्यावर जाते आणि क्षणार्धातच समोरून वेगाने धावणारा ट्रक येतो. यानंतर शेवटी नको तेच होऊन बसते. चिमुलीचे रस्त्यावर जाणे आणि ट्रकचे येणे इतक्या पटकन घडते की क्षणार्धातच ही चिमुकली मुलगी त्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून जाते. ही सर्व घटना इतकी थरारक आहे की पाहता क्षणी तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
ही सर्व घटना @kathashinde नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये, “लहान मुलांना सांभाळून ठेवा” असे लिहिण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना आशचर्याचा धक्का बसत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका युजरने लिहिले आहे , “आई वडीलांची चुक आहे”. तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे “घरवाल्यांची चुक आहे ड्रायव्हरची चुक नाही. आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मुलांवर लक्ष ठेवू शकता.” अनेक युजर्सने पालकांना दोष दिला आहे. पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे.
हेही वाचा:
पुन्हा हिट अँड रन! भरधाव टेम्पोने दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतला, चालकाला अटक
कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा तडाखा तिसऱ्या दिवशीही; पिकांचे मोठे नुकसान
सप्टेंबरअखेरपर्यंत लाडक्या बहिणींना मिळणार तिसरा हप्ता; महिलांच्या सशक्तीकरणास पाठिंबा