दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप, टीम इंडियाचा 6 विकेट्सने विजय

वूमन्स टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम (cricket)एकदिवसीय सामन्यात धमाका केला आहे. टीम इंडियाने तिसरा सामना 6 विकेट्सने जिंकला आहे. भारतीय संघाने या विजयासह दक्षिण आफ्रिकेला 3-0 ने क्लीन स्वीप दिला. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 40.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 220 धावा केल्या. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 90 धावा केल्या. तर इतर फलंदाजांनीही चांगली साथ दिली.

वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि श्रेयंका पाटील.

वूमन्स दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड्ट (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, अनेके बॉश, सुने लुस, मारिझान कॅप, नदिन डी क्लर्क, नॉन्डुमिसो शांगासे, मिके डी रिडर (विकेटकीपर), नॉनकुलुलेको मलाबा, अयाबोंगा खाका आणि तुमी सेखुखुने.

हेही वाचा :

गव्हाच्या पिठापासून झटपट बनवा चविष्ट चिली गार्लिक पराठा

पावसामुळे पोलीस भरतीची मैदानी चाचणी रद्द; अधीक्षकांनी दिली नवी तारीख

 मोठा नक्षलवादी हल्ला, ब्लास्टमध्ये जवान शहीद