मुख्यमंत्र्यांची “लाडकी बहीण”

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार(political consulting firms) यांनी गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. विद्यमान महायुती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आणि शेवटचे विधिमंडळ अधिवेशन होय. आणखी महिन्याभरात महाराष्ट्राच्या विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजू लागतील. निवडणुकांचा माहोल तयार होईल. ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आणि लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कसूर भरून काढायची असा संकल्प करून महायुती सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. महायुतीसाठी मतांचे मळे फुलवण्यासाठी सर्व घटकांना खुश करणारा हा अर्थसंकल्प आहे.

“मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण” ही अशीच महाराष्ट्रातील तमाम महिलांना(political consulting firms) खुश करणारी योजना या अर्थसंकल्पात मांडण्यात आली आहे. 21 ते 60 या वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. खिशात आहेत 70 रुपये आणि खर्च करणार आहे तर शंभर रुपये. पैसे आणणार कुठून असा एक सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे तर त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही योजना निवडणुकीपर्यंत असेल असे भाकीत विधिमंडळ अधिवेशनात बोलताना केले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लाडकी बहीण या योजनेचा धसका घेतला आहे असे त्यांच्या विधानावरून वाटते. ही योजना जाहीर करताना महायुतीच्या मनात राजकारण नव्हते किंवा त्यांच्यासमोर सत्तेचा सोपान नव्हता असे म्हणणे धाडसाचे होईल. ही योजना राजकीय हेतू प्रेरित आहे. मतांचे दान झोळीत पडण्याच्या हेतूने प्रेरित आहे असे कोणीही म्हणेल आणि त्यात वावगे असे काहीच नाही. लाडकी बहीण ही अतिशय महत्त्वकांक्षी योजना जाहीर करण्यापूर्वी, तिचा लाभ सर्व बहिणींना मिळेल याचे नियोजन केलेले आहे असे सध्या तरी दिसत नाही.

या योजनेसाठी आपली कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. या योजनेचा लाभ मिळवताना संबंधित बहिणींना काही कागदपत्रे सादर करावयाची आहेत. रहिवासी असल्याचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, रेशन कार्ड, वार्षिक उत्पन्नाचा दाखला अशी काही महत्त्वाची कागदपत्रे अर्जासोबत जोडावयाची आहेत. त्यामुळे अशी कागदपत्रे मिळवण्यासाठी तहसील कार्यालयासमोर मंगळवारी गर्दी उसळली होती. महाराष्ट्रातील महा-ई सेवा केंद्रामध्ये सुद्धा गर्दी उसळली होती. दिनांक 15 जुलै पर्यंत ही कागदपत्रे अर्जासह सादर करावयाची आहेत.
महाराष्ट्रातील लाभार्थी महिलांची संख्या मोठी आहे.

लाभार्थी बहिणींनी प्रतिज्ञापत्रही जोडावयाचे आहे. त्यासाठी शंभर रुपयांचा स्टॅम्प लागणार आहे. इतके स्टॅम्प उपलब्ध आहेत का? लाभार्थींना लागणारी कागदपत्रे तातडीने देण्याइतकी सक्षम यंत्रणा उभारण्यात आली आहे का?
तसेच कागदपत्रे जमा करून घेण्याची पुरेशी व्यवस्था आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जाऊ शकतात. या सर्व प्रश्नांचे सकारात्मक उत्तरे मिळणे अपेक्षित आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी (political consulting firms)विधिमंडळात बोलताना यासंदर्भात असेच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. साठी ओलांडलेल्या महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्यामुळे ही योजना 21 वर्षावरील सर्व महिलांसाठी असली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय राज्य शासनाकडे पुरेशा प्रमाणात शंभर रुपयांचे स्टॅम्प उपलब्ध असले पाहिजेत. अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी केलेल्या मागणीचाही शासनाने विचार केला पाहिजे.


या योजनेचा लाभ मिळवून देतो. सर्व प्रकारची कागदपत्रे मिळवून देतो. असे सांगून लाभार्थी महिलांकडून पैसे गोळा करणाऱ्या टोळ्या किंवा एजंट यांचा आता सुळसुळाट होईल आणि तसे चित्र मंगळवारपासूनच दिसू लागले आहे. गर्दी टाळण्यासाठी या योजनेसाठीची मुदत वाढवली पाहिजे किंवा त्यासाठी मुदतच असता कामा नये तरच गर्दी कमी होईल आणि एजंटांचा सुळसुळातही काही प्रमाणात थांबेल.

वास्तविक सर्वच राजकीय पक्षांनी ही योजना कोणी मांडली आहे याचा विचार न करता तिचा लाभ राज्यातील सर्व महिलांना मिळाला पाहिजे यासाठी अभियान सुरू करावे. त्यामुळे एजंटांकडून होणारी लूट टाळता येऊ शकते.
राज्यातील सर्व ई महा केंद्रे सक्षम असली पाहिजेत.

तेथील संगणक व्यवस्था उत्तम असली पाहिजे. संगणकांना बॅटरी बॅकअप पुरेशा प्रमाणात असला पाहिजे. कोणत्याही स्थितीत सर्वर डाऊन असे प्रकार होता कामा नयेत किंवा ते अतिशय कुर्मगतीने असू नयेत. सर्वर डाऊन आहे, विद्युत पुरवठा खंडित झाला आहे, बॅटरी बॅकअप संपला आहे अशा प्रकारच्या अडचणी संबंधितांनी सांगू नयेत. शासकीय यंत्रणेने लाडकी बहीण योजना गतिमानतेने यशस्वी केली तर या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनाही बहिणींचा आशीर्वाद मिळेल.

हेही वाचा :

सासूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही सोपे उपाय

रोहितने टी20 वर्ल्ड कप विजयानंतर का चाखलेली खेळपट्टीवरील माती?

दाक्षिणात्य अभिनेता प्रभासला डेट करतेय दिशा पटानी?