जयपूर-अजमेर महामार्गावर एका सीएनजी(cng) टँकरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 50 जण जखमी झाले आहेत. जयपूरमधील पेट्रोल पंपाजवळ एलपीजी ट्रक आणि सीएनजी ट्रक यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला. यामध्ये एकामागून एक 40 हून अधिक वाहने धडकली आणि जळून खाक झाली.
यात बसमध्ये प्रवास करणारे 6 प्रवासी जिवंत जळाले, तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.या घटनेनंतर जखमींना उपचारांसाठी जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सीएनजी(cng) टँकर चुकीच्या बाजूने येत होता आणि एलपीजी ट्रकला धडकला. यामुळे मोठा स्फोट झाला.
आज (20 डिसेंबर)जयपूरमध्ये सकाळी ही घटना घडली. या आगीत भरधाव वेगाने येणारी अनेक वाहने जळून खाक झाल्याची माहिती आहे. जयपूरमधील अजमेर रोडजवळ एका सीएनजी ट्रकची दुसऱ्या ट्रकला धडक बसली, त्यानंतर मोठा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन विभाग आणि पोलिसांच्या पथकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी धाव घेतली.
या अपघातामुळे आजूबाजूचा रस्ता दुतर्फा झाला आहे.अपघातात जळालेल्या वाहनांमध्ये अनेक ट्रक, प्रवासी बस, गॅस टँकर, कार, पिकअप, बाइक यांचा समावेश आहे. जयपूर अजमेर द्रुतगती मार्गावर झालेल्या या भीषण अपघाताची मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी दखल घेतली असून त्यांनी घटनास्थळी पोहोचत संपूर्ण माहिती घेतली.
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी स्वत: जयपूरमधील एसएमएस रुग्णालय गाठले आणि जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी रुग्णालयात जाऊन आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि जखमींची योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे जयपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
मलायका अरोरा आणि अरबाज पुन्हा दिसले एकत्र
भाजपा म्हणजे नटरंगी नार, ‘या’ नेत्याची जहरी टीका
गुड न्यूज! आठवड्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर