१० रुपयांची कॉफी विकली २० रुपयांना, तक्रार करताच मॅनेजरनं प्रवाशाला केली मारहाण, रेल्वेमधील व्हिडीओ व्हायरल

रेल्वेमध्ये विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात(video). कारण या पदार्थांमध्ये कधी पाल, झुरळ, कीड असे जीव सापडतात तर कधी हे पदार्थ तयार करताना जी अस्वच्छता असते त्यामुळे वाद निर्माण होतात. या गोष्टी कमी आहेत म्हणून की काय, आता हे पदार्थ MRP पेक्षा जास्त किंमतींना विकले जात असल्याचे प्रकार देखील घडू लागले आहेत.

होय, ‘बेगमपुरा एक्सप्रेस’मधील एक व्हिडीओ(video) समोर आला आहे. या एक्सप्रेसमध्ये पेट्री बॉयनं १० रुपयांची कॉफी २० रूपयांना विकली. आणि जेव्हा प्रवाशानं या प्रकरणी मॅनेजरकडे तक्रार केली. तेव्हा माफी मागण्याऐवजी मॅनेरनं उलट प्रवाशाचीच धुलाई केली. चहाच्या किंमतीवरून ट्रेनमध्ये झालेल्या या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

एका तरुणानं ट्रेनने प्रवास करताना कॉफी खरेदी केली. ही १० रुपयांची कॉफी त्याला २० रुपयांमध्ये विकण्यात आली. परिणामी प्रवाशानं खरेदी केलेल्या कॉफीचं बिल मागितलं. अर्थात हे बिल देण्यासाठी पेट्री बॉय तयार नव्हता. मग काय त्यानं थेट मॅनेजरशी संपर्क साधला. पण मॅनेजरसुद्धा उडवा उडवीची उत्तरं देऊ लागला. त्यामुळे प्रवाशानं ही संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरूवात केली. जेणेकरून या व्हिडीच्या मदतीनं त्याला या लोकांची तक्रार करता येईल. पण व्हिडीओ सुरू झाल्यामुळे मॅनेजर भडकला आणि उलट त्यानं प्रवाशाला मारहाण सुरू केली.

सुरूवातीला मॅनेजरने फ्रीमध्ये कॉफी घेण्यास सांगितलं. पण प्रवाशी फ्रीमध्ये कॉफी घेण्यास तयार नव्हता. कारण ही १० रुपयांची कॉफी ते २० रुपयांना का विकत आहेत? ट्रेनमध्ये १० रुपयांचा भ्रष्टाचार का केला जातोय? असा रोखठोक सवाल त्यानं केला. पण अर्थातच फसवणूक करणारी लोकं काही योग्य उत्तरं देत नाहीत. उलट मॅनेजरनं प्रवाशासोबत उलट हाणामारीच केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्ही देखील पाहा, अन् सांगा काय वाटतं तुम्हाला या प्रकरणी तुमचं मत काय आहे?

हेही वाचा :

महिलांना एक खून माफ करा खडसेंकडून व्यवस्थेवर प्रहार

प्रत्येक महिन्याला महिलांना मिळणार 2500 रुपये, नेमकी काय आहे योजना?

भारत आणि न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यात पाऊस अडथळा ठरणार?