राज्यात थंडीची लाट; पारा दहा अंशांखाली…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा(Temperature)पार चांगलाच खाली येताना दिसत आहे. उत्तरेकडे थंड वाऱ्यांचा जोर वाढल्यानंतर अंदमानच्या समुद्रात कमी दाबचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून, यामुळे राज्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. तर उत्तर महाराष्ट्रात तापमानात प्रचंड घट झाली आहे. धुळ्यात 4.1 अंश सेल्सियस अशा नीच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्यात 10.1 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. पुढचे दोन दिवस देखील राज्यात आणखी थंडीचा लाट वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील किमान तापमान घसरले आहे. पुणे येथील एनडीए परिसरात ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची (Temperature) नोंद झाली आहे. शनिवारी पहाटे एनडीए परिसरात नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तसेच चक्रकार वाऱ्यांची स्थिती समुद्र सपाटीपेक्षा ५.८ किमी आहे. त्यामुळे वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे.

देशातील १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील अनेक भागात थंडीची लाट येऊन उत्तर भारतात तीव्र थंडीने कहर केला आहे. मैदानी राज्यांमध्ये गेल्या २४ तासांत किमान तापमान ५ ते १० अंशांवर पोहोचले आहे. राजस्थान आणि पंजाबमध्ये काही ठिकाणी पारा शून्याच्या खाली नोंदवला गेला.

पंजाब आणि मध्य प्रदेशात थंड वारे वाहत आहेत. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड, पश्चिम बंगालचे गंगा मैदान, बिहार, महाराष्ट्राचे विदर्भ, सौराष्ट्र आणि गुजरातचे कच्छ या भागात थंडीची लाट पसरली आहे. दक्षिण आणि किनारी भारताव्यतिरिक्त इतर भागांना थंडीने वेढले आहे.

देशाची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमधील किमान तापमानातही १ अंशाची घट झाली आहे. राजधानीत विविध ठिकाणी किमान तापमान ६ ते ८ अंशांच्या दरम्यान नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा १ ते ३ अंशांनी कमी आहे. कमाल तापमान सामान्यच्या जवळपास राहिले. शुक्रवार आणि शनिवारी २० किलोमीटर वेगाने थंड वारे वाहत होते.

जम्मू-काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान मायनसमध्ये आहे. बर्फवृष्टीमुळे येथील किमान तापमानात घट झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. झोजिला येथे उणे २२ अंश तापमानाची नोंद झाली. त्याच वेळी, श्रीनगरमध्ये उणे ३.४, पहलगाममध्ये उणे ४.०, गुलमर्गमध्ये उणे ३.८ तापमान नोंदवले गेले.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्या – चांदीचे भाव पुन्हा घसरले

निक्की आणि अरबाजचे सोशल मीडियावर नको तसले फोटो व्हायरल…

महायुतीत नाराजीची लाट! नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजप समर्थक आमदार थेट घरी