मालमत्ता कराच्या वसुलीबाबत मुंबई (mumbai)महापालिकेने कडक धोरण अवलंबले असले तरी कर भरणा करण्यासाठी लवचिकता ठेवली आहे. पालिकेने 24 वॉर्डमधील नागरी सुविधा पेंद्रे पुढील दोन दिवस रात्री 10 वाजेपर्यंत, तर मुदतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 25 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत खुली ठेवली आहेत. कर थकवू नका आणि कारवाई टाळा, असे आवाहन मुंबई महापालिपेने केले आहे.
मुंबई (mumbai)महापालिकेचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेला मालमत्ता कर गोळा करण्यावर पालिका प्रशासनाचा भर असतो. 2023-24 या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरणा करण्याची अंतिम तारीख शनिवार, 25 मे रोजी संपणार आहे. कर भरणा गैरसोय होऊ नये, यासाठी महापालिकेने गुरुवार, 23 आणि शुक्रवार, 24 मे रोजी सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत तसेच शनिवार, 25 मे रोजी सकाळी 8 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत नागरी सुविधा पेंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
थकीत मालमत्ता कर न भरणाऱया मालमत्ताधारकांवर आता आणखी कठोर कारवाई केली जाणार असून 25 मेपर्यंत कर भरणा केला नाही तर अशा कर चुकवेगिरी करणाऱया मालमत्ताधारकांच्या थकीत करावर दरमहा दोन टक्के दंड आकारण्यात येणार आहे. मात्र दिलेल्या मुदतीत मालमत्ताधारक कर भरणा करतील, असा विश्वास पालिपेने व्यक्त केला आहे.
…तर जप्ती, अटकावणीची कारवाई होणार
काही मालमत्ताधारक पालिकेच्या आवाहनानंतरही कर भरणा करत नाहीत. मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी सातत्याने आवाहन आणि पाठपुरावा करूनही मालमत्ता कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱया मालमत्ताधारकांवर महापालिकेकडून जप्ती आणि अटकावणीची कारवाई करण्यात येते. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचा काही दिवसांनंतर पालिका लिलाव करते.
हेही वाचा :
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना ‘या’ नावानं मारतात हाक
भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल