भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ब्रिस्बेन येथे खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली. बुमराहने या डावात पाच विकेट घेतल्या. यासह सर्वांनी पुन्हा एकदा बुमराहचे कौतुक करण्यास सुरुवात केली, परंतु कॉमेंट्री दरम्यान ऑस्ट्रेलियाची माजी महिला क्रिकेटर (Cricketer) ईशा गुहाने भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहवर वांशिक टिप्पणी केली आणि त्याला पुरुष वानर म्हटले. गुहा यांनी आता याप्रकरणी स्पष्टीकरण दिले असून त्यांनी माफीही मागितली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये भारताचे माजी खेळाडू आणि कोच रवी शास्त्री आणि माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर (Cricketer)ॲडम गिलख्रिस्ट यांच्यासमोर कॉमेंटेटरने माफी मागितली आहे. बुमराह हा सर्वात मूल्यवान खेळाडू असल्याचे गुहाने म्हटले होते. गुहा पुढे म्हणाली की, “तो सर्वात मौल्यवान खेळाडू आहे.” त्यामुळे गुहा यांच्यावर प्रेक्षकांनी टीका केली आणि त्यांना त्यांची चूक समजावून सांगितली. ही बातमी गुहापर्यंत पोहोचली आणि आता त्यांनी टीव्हीवर येऊन सर्वांसमोर याबद्दल माफी मागितली आहे.
याबाबत गुहा यांनी फॉक्स टीव्हीवर येऊन शोमध्ये माफी मागितली. या शोचे होस्ट माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲडम गिलख्रिस्ट होते आणि भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीही त्यात उपस्थित होते. कॉमेंटेटर गुहा म्हणाली की, “काल कॉमेंटेटरी करण्याच्या वेळी मी एक शब्द वापरला ज्याचा अनेक प्रकारे अर्थ लावला जाऊ शकतो. माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मला माफी मागायची आहे. जेव्हा इतरांच्या प्रेमाचा आणि आदराचा प्रश्न येतो तेव्हा मी स्वतःसाठी खूप उच्च मापदंड ठेवले आहेत. आपण संपूर्ण कथा ऐकल्यास, मी त्याच्यासाठी खूप प्रशंसा करतो मी.”
बुमराहचे कौतुक करताना चुकीचा शब्द वापरल्याचे गुहाने मान्य केले. ती म्हणाली, “मी त्याचे यश योग्य शब्दात मांडण्याचा प्रयत्न करत होते आणि मी चुकीचा शब्द वापरला. यासाठी मी मनापासून माफी मागते. मला आशा आहे की लोकांना हे समजेल की माझा हेतू कोणाचेही नुकसान करण्याचा नव्हता. भावना दुखावण्याचाही हेतू नव्हता. किंवा काहीही चुकीचे बोला.”
A very genuine apology from Isa Guha. pic.twitter.com/W97FCCEP93
— Dan News (@dannews) December 15, 2024
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस सुरु आहे. आजचा सामना सुरु झाला परंतु पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. सध्या भारताच्या संघाने ४ विकेट्स गमावले आहेत. आता टीम इंडियासाठी रोहीत आणि राहुल फलंदाजी करत आहेत. ऑस्ट्रेलियाने संघासाठी पहिल्या इनिंगमध्ये ४७५ धावा केल्या आहेत.
हेही वाचा :
डिसेंबरच्या शेवटी राज्यात मोठा राजकीय भूकंप?
प्रकाश अबिटकर मंत्री झाले त्याची काही खास कारणे…!
जंगलाच्या राजाची छेड काढणं तरुणांना पडलं महागात; सिंहाने हल्ला केला अन्… Video