कोल्हापुरातील ‘या’ दोन उमेदवारांना आयोगाची नोटीस; निवडणुकीचा खर्च अमान्य

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणुकीचा प्रचार(expense report) थांबला असताना रविवारी ( 5 मे ) निवडणूक प्रशासनाने उमेदवारांच्या खर्चाचा तपशील जाहीर केला. या खर्चाच्या तपशिलावरून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय मंडलिक आणि काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या खर्चात तफावत दिसून आली आहे. या दोन्ही मतदारसंघात सर्वात जास्त खर्च कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केला आहे. त्या पाठोपाठ शाहू महाराज छत्रपती यांनी केला आहे. मात्र, निवडणूक आयोगानं काढलेला खर्च आणि उमेदवारांनी दिलेल्या खर्चाची माहिती, यात तफावत दिसून आली आहे. त्यामुळे आयोगानं दोन्ही उमेदवारांना नोटीसा बजावल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून होत असलेल्या खर्चावर(expense report) निवडणूक आयोगाचं बारीक लक्ष असून, दररोज आढावा घेतला जातो. दैनंदिन प्रचारात उमेदवाराने किती खर्च केला याचा आढावा दिवसेंदिवस निवडणूक प्रशासनाला मिळतो. रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस संपल्यानंतर निवडणूक प्रशासनाने कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपशील जाहीर केला आहे.

निवडणूक खर्च विभाग व उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज व शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी खर्चाच्या तफाकतीवर आक्षेप घेतला आहे.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा खर्च 41 लाख 41 हजार 484 रुपये एवढा झाला आहे. त्यांच्याकडून एकूण खर्चापैकी खर्चापैकी 4 लाख 78 हजार 400 रूपये इतका खर्च अमान्य केला आहे. तर संजय मंडलिक यांचा खर्च 52 लाख 29 हजार 828 रुपये एवढा झाला आहे. त्यांनी 21 लाख 20 हजार 392 रुपये खर्च अमान्य केला आहे. त्यामुळे निवडणूक प्रशासनाकडून यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रमुख तीन उमेदवारांनी देखील आपला खर्च निवडणूक प्रशासनाला दिला आहे. या मतदारसंघात सर्वाधिक खर्च स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केल्याचे दिसून येते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 27 लाख 47 हजार 957 रूपये, महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांनी 20 लाख 64 हजार 564 रूपये, महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी 18 लाख 53 हजार 231 इतका खर्च दाखवला आहे.

हेही वाचा :

लोकसभा निवडणूक प्रचारात “व्यवस्थे”वरच संशय व्यक्त

एक, दोन नाही तर चार वेळा धडपडली काजोल Video Viral

हातकणंगले मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंची ऑफर काय होती अन्… ? राजू शेट्टी