राज्यात जून महिन्याला सुरूवात होताच अनेक ठिकाणी पावसाने(vegetable) हजेरी लावली आहे. मात्र अद्यापही दुष्काळ असलेली गावं पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. दुष्काळाचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला आहे. उत्पादन कमी झाल्याने २० ते ३० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या भाज्यांच्या दरांनी थेट शंभरी पार केली आहे. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला बसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ बाजारात(vegetable) फरसबी, वाटाणा आणि दोडका या भाज्यांच्या किंतमी १५० हून अधिक झाल्यात. आज या भाज्यांचा भाव १६० रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. या महिन्यात अखेरपर्यंत भाज्यांचे दर असेच कायम राहण्याची शक्यता आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी २२४२ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये पालेभाज्यांच्या ४ लाख ६० हजार जुड्या आहेत. तर १३५ टन गाजर, १६९ टन कोबी आणि १८३ टन टोमॅटोची आवक झाली आहे.
या तीन भाज्या वगळता इतर भाज्यांची आवक मोठ्याप्रमाणावर घसरली आहे. फरसबी फक्त ८ टन आलीये. तर टोमॅटो फक्त ७ टन आलेला आहे. त्यामुळे समितीमध्ये १०० ते १२० आणि किरकोळ मार्केटमध्ये १४० ते १६० रुपये किलो दराने फरसबी आणि टोमॅटो विकले जात आहेत.
वाटाण्याची आवक तब्बल ८३ रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे होलसेल बाजारात वाटाणा १२० रुपये किलो आणि किरकोळ बाजारात मार्केटमध्ये वाटाणा १६० रुपये किलो आहे. ढोबळी मिरची ८० ते १०० रुपये किलो आहे. शेवग्याच्या शेंगा १०० ते १२० रुपये किलो आहेत.
हेही वाचा :
सुनील गावस्करांनी केली Virat Kohli ची पाठराखण
मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात करणार मोठी गुंतवणूक
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; म्हणाले “ नावं घेऊन तुमचे उमेदवार पाडणार”