‘गरीबी हटाव’चा नारा फक्त इलेक्शन पुरताच; उदयनराजे भोसलेंचे काँग्रेसवर टीकास्त्र

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचे(company slogans) वारे वाहू लागले आहेत. साताऱ्यातून खासदार उदयनराजे भोसले हे महायुतीचे संभाव्य उमेदवार असून उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजेंनी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. कोरेगावमध्ये भाजपा स्थापना दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंनी थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

साताऱ्यातील कोरेगाव येथे भाजपचा 44 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी खासदार उदयनराजे(company slogans) यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. “काँग्रेस काळात गरीबी हटावच्या घोषणा असायच्या. इलेक्शनच्या काळात अगदी तळमळीने तळागाळातल्या लोकांबाबत बोलले जायचे. पण निवडणुकीचा निकाल लागला की पुढच्या निवडणुकीपर्यंत तळागाळातल्या लोकांना तळागाळातच राहावे लागले,” असा टोला उदयनराजेंनी लगावला.

तसेच ” तळागाळातल्या लोकांना हात देऊन वर खेचण्यापेक्षा गाळात घालण्याचे काम झालेले पाहायला मिळाले. याऊलट भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणे पाहिली तर दुर्लक्षित, दुर्गम, वंचित, शेतकरी, गरजू, महिला, सर्वांसाठी अनेक योजना राबवल्या गेल्या. एक नियोजन बद्ध कार्यक्रम मोदींच्या नेतृत्वाखाली आखण्यात आला,” असे उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.

दरम्यान, साताऱ्यातून एकीकडे उदयनराजे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून अद्याप याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कोण आव्हान उभे करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

बॉसच्या त्रासाला कंटाळले कर्मचारी, चक्क गुंडांना दिली सुपारी! हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

आलिया-रणबीरची लाँग ड्राईव्ह नाही तर… 8 कोटींच्या गाडीची नंबर प्लेट चर्चेत

गर्भपातानंतर कन्सिव्ह करणं कठीण, 41 व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्री झाली आई!