कोल्हापुरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे(accident). कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावरील बोरपाडळे(accident) इथे डंपर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील पती – पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मारुती रामचंद्र महाजन आणि सुगंधा मारुती महाजन हे आपल्या ॲक्टीव्हा गाडीवरुन निघाले होते. यावेळी बोरपाडळे इथे त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. डंपरवरील चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोल्हापुर शहरात हीट अँड रन अपघात समोर आला होता. शहरातील चौकात एका भरधाव कारने सहा ते सात वाहनांना चिरडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा :
मलायका अरोरा हिचे अत्यंत मोठे विधान, म्हणाली, मी फक्त म्हातारीच नाही तर तरूण मुलासोबत…
लोकसभा निवडणुकीच्या काळात शेअर बाजारात मोठा स्कॅम, राहुल गांधींचा आरोप
मराठ्यांचा संघर्ष आता मोठ्या पडद्यावर; ”आम्ही जरांगे” १४ जूनला चित्रपटगृहात दाखल