मोबाईलचं नेटवर्क गेल्यास मिळणार भरपाई; टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले

मोबाईल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दूरसंचार क्षेत्राचे नियामक(network) ट्राई ने ग्राहकांना दिलासा देणारे नवीन नियम जाहीर केले आहेत. या नवीन नियमांनुसार, जिल्ह्याच्या स्तरावर २४ तासांपेक्षा जास्त वेळ नेटवर्क बंद राहिल्यास संबंधित मोबाइल कंपन्यांना ग्राहकांना भरपाई करावी लागणार आहे.

इतकेच नाही तर नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक रक्कमही (network)वाढवण्यात आली आहे. आता ही रक्कम ५०,००० रुपयांवरून वाढून १ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. या नवीन नियमांनुसार, नियमांच्या उल्लंघनाच्या स्वरूपानुसार दंडाची रक्कम १ लाख, २ लाख, ५ लाख आणि १० लाख रुपये अशी राहणार आहे. या नियमांमुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळण्याची हमी मिळते.

यापूर्वी दूरसंचार सेवांच्या गुणवत्तेवर वेगवेगळे नियम होते. मात्र आता ट्राईने “ग्राहकसेवा गुणवत्ता मानके (वायर्डलाइन आणि वायरलेस) आणि ब्रॉडबँड (वायर्डलाइन आणि वायरलेस) सेवा नियमावली, २०२४” अंतर्गत हे केले आहेत.

ग्राहकांना मिळणारा फायदा
-२४ तासांपेक्षा जास्त वेळ नेट बंद राहिल्यास, पोस्टपेड ग्राहकांना सूट आणि प्रीपेड ग्राहकांच्या रिचार्ज व्हॅलिडिटी वाढवून द्यावी लागणार आहे.

-दुरुस्तीमध्ये झालेला विलंब किंवा २४ तासांपेक्षा जास्त वेळ नेट बंद राहिल्यास, पोस्टपेड ग्राहकांना त्यांच्या सदस्यता शुल्काच्या प्रमाणात पुढील बिलिंग चक्रात सूट मिळणार आहे.

-लॅण्डलाइन सेवा पुरवठादारांनाही ग्राहकांच्या तक्रारी ३ दिवसांपेक्षा जास्त काळात सोडविल्या नसल्यास, नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

-ब्रॉडबँड सेवा पुरवठादारांना ७ दिवसांच्या आत ९८ टक्के कनेक्शन सुरु करावे लागणार आहे.

ग्राहकांना त्यांच्या भागातील 2G, 3G, 4G आणि 5G सेवांच्या कव्हरेजची माहिती मिळण्यासाठी मोबाइल सेवा पुरवठादारांनी त्यांच्या वेबसाइटवर नकाशा दर्शवणे आवश्यक आहे. या नवीन नियमांमुळे ग्राहकांना दूरसंचार कंपन्यांकडून चांगली सेवा मिळण्याची हमी मिळते. तसेच, नेट बंद राहिल्यास त्यांचे नुकसान भरपाई केली जाणार आहे. हे नियम सहा महिन्यांनंतर लागू होणार आहेत.

हेही वाचा :

राज्यातील 15 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; पावसाच्या ठिकाणांची माहिती

सांधेदुखीला आराम देणारे योगासन: तुम्ही अजून प्रयोग करून पाहू शकता

गुंडांचा धुमाकूळ: हत्यारे भिरकावून आणि वाहनांची तोडफोड