कोस्टल रोडवर पूर्ण प्रवास ऑक्टोबरमध्येच

मुंबईकरांचा(mumbai) प्रवास वेगवान करणारा कोस्टल रोडची एक लेन सध्या सुरू करण्यात आली असली तरी पूर्ण क्षमतेने कोस्टल रोड ऑक्टोबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या संकल्पनेतून आणि पाठपुराव्याने होणाऱया या मोठय़ा प्रकल्पाचे श्रेय घेण्यासाठी मिंधे सरकारने या प्रकल्पाच्या एका लेनचे लोकार्पण घाईघाईने आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केले. तर पुन्हा अशाच प्रकारे विधानसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण प्रकल्प सेवेत आणण्याचे नियोजन असल्याचे समजते.

पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ सागरी मार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले असून एकूण 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी सी लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. तब्बल 14 हजार कोटींवर रुपये खर्च करून कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मात्र या मार्गावर आताच भेगा पडल्याचे समोर आल्यानंतर भुयारी मार्गाच्या सांध्यांमध्ये गळती होत असल्याचा प्रकारही समोर आला आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून डागडुजी करण्यात येत आहे. सध्या वरळी ते मरीन ड्राईव्ह ही 9 किमी मार्गिका 12 मार्चपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये कोस्टल रोड बांधकामास सुरुवात झाली आहे. दरम्यान, मरीन ड्राईव्ह ते हाजी अली या मार्गाचा उत्तरेकडील भाग 10 जूनपर्यंत खुला करण्याची योजना आहे आणि त्यानंतर वरळीपर्यंतच्या रस्त्याची कामे सुरूच राहतील.(mumbai)


असे आले प्रकल्पात अडथळे
डिसेंबर 2018 मध्ये समुद्रात भरणी टाकण्याचे काम सुरू होते. जानेवारी 2019 मध्ये ब्रीच कॅण्डी, मलबार हिल आणि वरळी येथे भरणी टाकण्याचे काम करण्यात आले. एप्रिल 2019 मध्ये तीन जनहित याचिका दाखल न्यायालयात दाखल करण्यात आल्या, उच्च न्यायालयाने पुढील सूचना येईपर्यंत पुनर्वसन थांबवण्याचे आदेश दिले होते. डिसेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कामकाज सुरू करण्यास परवानगी दिली, मार्च 2020 मध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला. दोन पिलरमध्ये 120 मीटरपर्यंत बदल झाल्यामुळे नोव्हेंबर 2023 ते मार्च 2024 पर्यंत रोडला विलंब झाला. 2022 मध्येच सरकारने 56 मीटरवरून 120 मीटरपर्यंत वाढवण्यास सहमती दर्शवली होती.

हेही वाचा :

इचलकरंजीत काळ्या ओढ्यातील कचरा काढण्याचे काम सुरू

अभिमानास्पद….‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट ठरला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट

आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?