मुंबई : भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने विधान सभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. भाजपा व निवडणुक आयोगाची ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस(Congress) पक्ष शनिवारी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस(Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणुक आयोगाच्या मदतीने घोटळा केला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे निवडणूक आयोग देत नाही.
राज्यात आलेले सरकार आपल्या मताचे नाही अशी जनभावना निर्माण झाली असून मतदान मतपत्रिकेवरच घ्यावे, अशी मागणी जनतेतूनच येत आहे. लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे, निवडणूका या निष्पक्ष, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पाडल्या पाहिजेत यासाठी काँग्रेस राष्ट्रीय मतदार दिनी दिवशी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
उद्याच्या आंदोलनात काँग्रेस(Congress) पक्षाचे नेते आमदार खासदार, माजी आमदार खासदार, जिल्हा पदाधिकारी, विभाग व सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. राज्यात पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. तर महायुतीला मोठा धक्का बसला होता. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला.
मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, तर महाविकास आघाडीचा जोरदार पराभव झाला. महायुतीनं राज्यात 232 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीचे तीन पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. त्यानंतर आता विरोधकांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे.
मारकडवाडी गावानंतर तालुक्यातील धानोरे गावाने आमची मतं नेमकी गेली कुठे हे निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर अथवा चिठ्ठी काढून दाखवावे, असा सूर गवसत १२०० नागरिकांनी हात उंचावून मतदान जाहीर केले. याबाबतचा ठरावही करण्यात आला आहे.
हेही वाचा :
सामंजस्य कराराचे फलित, कोल्हापूर मात्र सदैव वंचित
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! आजपासून लालपरीचा प्रवास महागला तर रिक्षा-टॅक्सी प्रवासही महागला
राजपाल यादव यांच्या वडिलांचे निधन, दिल्लीतील AIIMS मध्ये सुरु होते उपचार!