महाराष्ट्र विधानसभेचा अभूतपूर्व निकाल लागला आहे. कारण यावेळी महायुतीने(political updates) सर्वाधिक जागा मिळवून सत्ता स्थापन करण्यावर भर दिला आहे. यावेळी महायुतीने 233 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 51 जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र सर्वात धक्कादायक म्हणजे यावेळी विधानसभेला काँग्रेसचे दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या विधानसभेत भाजप(political updates) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण राज्यात तब्बल 20 जिल्ह्यातून काँग्रेस पक्ष हद्दपार झाल्याचं दिसून येत आहे. यावेळी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
यावेळी धुळे, जालना, बीड, हिंगोली, धाराशिव, पुणे, छ. संभाजीनगर, सोलापूर, सातारा, अमरावती, वर्धा, कोल्हापूर, बुलढाणा, ठाणे, पालघर, रत्नागिरी , सिंधुदुर्ग , नाशिक, रायगड, जळगाव या जिल्ह्यातून काँग्रेसला प्रभाव करावा लागला आहे.
कोण कोणते दिग्गज नेते पराभूत? :
राजेश टोपे
बाळासाहेब पाटील
बाळासाहेब थोरात
धीरज विलासराव देशमुख
पृथ्वीराज चव्हाण
ऋतुराज पाटील
तर या विधानसभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील पराभव झाला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती. यावेळी भाजपचे अतुल भोसले यांनी त्यांचा पराभव केला आहे. तसेच कराड दक्षिणमध्ये 17 व्या फेरीनंतर अतुल भोसले यांनी तब्बल 38 हजार मतांची लिड मिळवली होती. मात्र यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना ही लीड तोडण्यात अपयश आलं आहे.
हेही वाचा :
‘कोण किशोर कुमार?’ आलिया भट्टच्या प्रश्नानं रणबीरला बसला धक्का
नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार? विधासभेतील अपयशानंतर पटोलेंचा मोठा निर्णय
विधानसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका; ‘त्या’ निर्णयाने खळबळ